पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

055813 स्फुट _या खंडाला स्फुट हा मथाळा दिला, याचे कारण असें आहे की, मासाहेबांच्या संबंधामी जितकी माहिती मि- ळाली तितकी त्यांच्या चरित्रांत अवश्य आली पाहिजे. त्यांचे आप्तस्वकीय, मानकरी, माहेरची माणसे, आश्रित, मैत्रिणी सन्निध असणारे सेवक यांजकडून ही साधनें मिळावयाची, हाणून आह्मी मधुमक्षिकेची मधुकरवृत्ति स्वीकारली. फुलां- तला एक एक मधुबिंदु जमा करून ती आपलें संचयाचे काम करिते, तशी ज्यांकडून जी थोडीबहुत माहिती मिळाली ती व पुस्तकांत मिळालेली दिली आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे'. प्रयत्न करितां करिता संग्रह होत गेला त्याचा निरनिराळ्या खंडांत उपयोग केला. बाकी राहिलेल्या गोष्टींमा या खंडांत जागा दिली आहे. SHRS (क) मासाहेबांना आपली स्तुति केलेली आवडत नसे. एक चांगला सुशिक्षित गृहस्थ एकदा त्यांच्या समोर त्यांच्या स्तुतिस्तोत्राचा धूप जाळीत बसला. बराच वेळ गेल्यावर त्या त्याला रागाने झणाल्या-शास्त्रीबोवा, तुह्माला दुसरा काही उद्योग नाही की काय? मअपुढे माझ्या नांवाचा धूप जाळीत बसला आहां, यापेक्षां श्री तारकेश्वरासन्निध पोथी-पुराण वाचून त्याचे गुणानुवाद गाल तर त्यांत तुमचे व माझें दोघांचेही कल्याण आहे. मी जिवंत असे पर्यंत