पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतर महाराजसाहेबांनी भाषण केलें तें असें:-'आपले स्वागत करण्याला मासाहेबांची मला आज्ञा झाली आहे. मासाहेबांच्या संबंधाने में आपण ह्मणाला त्याबद्दल त्या आ- पल्या फार आभारी आहेत' यानंतर मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी बरेच मोठे भाषण केले. ते सर्व देण्याचे हे स्थळ नाही. शे- वटी ते ह्मणाले-'मासाहेबांच्या आदरातिथ्याने बडोद्यास आलेल्या सर्व युरोपियन स्त्रिया व पुरुष खुष झाले आहेत. सर्वांच्या मुखांतून मासाहेबांचे गुणानुवाद ऐकू येतात. पूर्वी चे इतिहास पाहिले तर कैक राजघराण्यांतील राण्या व कन्या मुत्सद्दीपणांत व लढायांच्या मसलती करण्यांतही पुढारी होत्या. त्या केवळ आपल्याला जनानखान्यांतच को. डून घेऊन राहत नसत. प्रस्तुतच्या शांततेच्या वेळी त्या गुणांचे कारण राहिले नाही; परंतु, पूर्वी प्रसिद्धीस आ- लेल्या स्त्रियांच्या अंगी मत्सद्दीपणा, वगैरे जे गुण होते ते मासाहेबांच्या अंगीही वसत आहेत. त्यांच्याच योग्यनेच्या त्या आहेत' इत्यादि भाषण झाल्यावर उत्तम प्रकारची आतसबाजी सुटली व युरोपियनलोकांचा बडा नाच झाला. ताराबाबा व महाराजसाहेब यांच्या लग्नाप्रीत्यर्थ लाखो रुपये खर्च झाले. असा मोठा समारंभाबडाद्यांत फार वर्ष झाला नव्हता. KANERRE L ATES सार्वजनिक वाचनालय रोड, (पुपो.)