पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्या होत होत्या. शृंगारलेले हत्ती, घोडे, गाड्या, पालख्या ब मेणे जेथे तेथे दिसत होते. देशी वाजंत्री व परदेशी ब्यांड- बाजे वाजत होते. पलटणी शिपाई व पोलिसचे शि. पाई राजरस्त्यावर बंदोबस्तासाठी व शोभेकरितां उभे केले होते. रात्री रोषनाई व चिराकदानें, वारांगनांचे नाचरंग, मेजवान्या, आतसबाज्या व मिरवणुकी जात होत्या. दिवसां अगडांतल्या साठमाया, शेतकीची प्रद- र्शने, सार्वजनिक बागेतले नामात-हेचे तमाशे व खेळ, आणि वाराशाच्या मैदानात लष्करी लोकांच्या परेडी, रव्या व कवायती मधून मधून होत होत्या. शहरच्या लोकांना व बाहेरच्या पाहुण्यांना हा सबंध महिना मोठ्या थाटाचा, मजेचा व आनंदाचा गेला. तारीख १२ जानेवारी १८८० या दिवशी लक्ष्मी- विलास राजवाड्याच्या पायाचा दगड बसविण्याचा विधि मि. मेव्हिलसाहेबांच्या हाताने झाला. त्याच रात्री मोतीबागेत युरोपियन पाहण्यांचा बडा खाना व बड़ा नाच झाला. त्या मंडळींत युरोपियन स्त्रियाही पुष्कळ होत्या. त्यासमयीं मेल्व्हिल्साहेब ह्मणाले-महाराज साहेबांची वर्तणक आजपर्यंत चोख राहिली याचे कारण मासाहेब होत, व त्याजबद्दल आली त्यांचे आभारी आहों. राजवाडयांत त्यांची नजर महाराजसाहेबांच्या वर्तणुकीवर नसती तर त्यांना वाईट गुण लागल्यावांचून राहतेना. त्यांना कोणताही वाईट गुण लागला नाही, हे त्यांच्या दक्षतेचे व काळजीचें फळ होय. f muses