पान:केसरीवरील खटला.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
केसरीवरील खटला

हें सांगावयास नको. शिक्षा भोगावयाची असली, तरी ती नोकरशाहीच्या डावपेंचांशी उलट डावपेंच करीत नाइलाज होईल तेव्हांच आनंदानें भोगावी अशा मताचा मी आहे व म्हणूनच मी आपला कसून डिफेन्स दिला. या खटल्यांत मला ५२०० रु. दंड झाला व तो सर्व केसरी संस्थेनेंच भरला आहे. हा दंड सार्वजनिक वर्गणी करून द्यावा अशा अनेक भित्रांकडून सूचना आल्या. या सूचनांबद्दल मी व केसरी संस्था सर्वांचे अत्यंत आभारी आहों. तरी परंतु केसरी संस्थेनेंच ह्या दंडाचा भार सोसण्याचे ठरविले आहे. आतांपर्यंत केसरी ऑफिसमध्ये आलेल्या सुमारें ७/८ शें रुपयांच्या मान- ऑर्डरी आभारपूर्वक परत करण्यांत आल्या आहेत. कालच दिल्लीचे एक मारवाडी व्यापारी शेठ गाडोदिया यांनी शंभर रुपयांची एक नोट पाठविले- ली मीं परत केली. या गृहस्थांची व माझी नेटिव्ह स्टेट्स कॉन्फरन्सचे वेळीं नुसती भेट झाली होती. तथापि सहानुभूतीने त्यांनी पत्र पाठविलें व शंभर रुपये पाठविले, याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे होत. लोकांनी या खटल्यांत आमच्याविषयीं जी प्रेमाची सहानुभूति दाखविली आहे, तिच्या योगानें आमच्या आंगावर मूठभर मांस चढल्यासारखें आम्हांला वाटत आहे. केसरीचे या दंडाच्या रूपानें खर्च झालेले पैसे अशा रीतीनें केसरीला सव्याज परत मिळत आहेत असेंच मी समजतों. लोकांच्या इतक्या सहानुभूतीची किंमत कांहीं कमी नाहीं. शिवाय या खटल्यामध्ये मला शिक्षा करून ब्रिटिश न्यायांची अब्रू राखण्याचा हायकोर्टानें केलेला प्रयत्नहि सपशेल फसला आहे. हायकोर्ट जज्जाला मूर्ख म्हणण्याला हरकत नाहीं, त्याला कायदा समजत नाही असे म्हणण्याल हरकत नाहीं, त्यांचा निकाल चुकला असें म्हणण्याला हरकत नाहीं. फ। हरकत असेल तर जजांनीं अप्रामाणिक हेतूनें आपला निकाल दिला असें म्हणण्याला आहे, हें या दंडाच्या मोबदल्यांत सिद्ध झालें.जजांनीं अ- प्रामणिक बुद्धीनें न्याय दिला असें माझें म्हणणें कधींच नव्हतें, सरकार या खटल्यांत करायला गेलें एक आणि झालें भलतेंच असें म्हटल्यावर चूक होणार नाहीं. सरकारचा आणि लोकपक्षाचा झगडा चालला आहे तो मला झालेल्या शिक्षेनें बंद थोडाच होणार आहे ? सरकारला जें प्रिय आणि आपल्या हिताचें वाटतें. ते आम्हांला प्रिय आणि हिताचें वाटणें