पान:केसरीवरील खटला.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८३

बेळगांवची जाहीर सभा

कधींच शक्य नाहीं. सरकारचे आणि आमचे हितसंबंध अगदी परस्पर- विरुद्ध आहेत व हिंदुस्थानाला स्वराज्य मिळेपर्यंत हे असेच चालणार यांत काडीचीहि शंका नाहीं. असल्या खटल्यांनी आमचीं तोंड बंद होणें एकी- कडेसच राहून, आपण हलवून खुंटा बळकट करीत आहों, असाच अनुभव सरकारला आल्याशिवाय राहणार नाहीं, हें त्यांनी पक्के ध्यानांत ठेवावें.

बेळगांवची जाहीर सभा

 बेळगांव येथे श्री० सदाशिवराव सोमण यांचे अध्यक्षतेखालीं जाहीर सभा मरून केसरीवर झालेल्या बेअदबीच्या खटल्यांत श्री० केळकर यांनी वर्तमानपत्रकार या नात्यानें लोकहिताची दृष्टि ठेवून खटला चालविला याबद्दल अभिनंदन करण्यांत आलें व ज्या लेखाबद्दल खटला झाला त्या लेखास मान्यता देणारा ठराव पास करण्यांत आला.