पान:केसरीवरील खटला.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्याणची जाहीर सभा

८१

८१

विला व मार्गात उजेड राखला याबद्दल आपणा सर्वातर्फे मी त्यांचें अभि- नंदन करतों.” याप्रमाणें भाषणे झाल्यावर टाळ्यांच्या प्रचंड गजरांत सभा बरखास्त झाली.  रात्रीं श्री० केळकर यांच्या स्नेही मंडळींनी त्यांस मेजवानी देऊन अल्पसा अहेरहि केला.

कल्याणची जाहीर सभा

 बॅ. सावरकरांना थैली अर्पण करण्याच्या समारंभाकरितां नाशिकास जाण्याकरितां तात्यासाहेब केळकर हे ता. २८ रोजी येथें येणार असे समजल्यावरून, कोर्टाची बेअदबी केल्याबद्दल त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या खटल्याचे वेळी त्यांनीं वर्तमानपत्रकारांची बाजू उत्कृष्टप्रकारें पुढे मांडून बजावलेल्या सार्वजनिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठीं जाहीर सभा भरविण्याचें येथील स्वराज्यपक्षाने ठरविलें; व त्याप्रमाणे ही अभिनंदनाचा समारंभ, श्री० बापूसाहेब फडके यांच्या अध्यक्षतेखालीं काल रात्रौ सुभेदारांच्या वाड्यांत करण्यांत आला. सभेमध्यें डॉ० बाबासाहेब परांजपे व स्वराज्यपक्षाच्या कल्याण शाखेचे चिटणीस रा० गणपतराव फडके यांनीं तात्यासाहेबांच्या अभिनंदनपर भाषणे केल्यानंतर तात्यासाहेब म्हणाले:-  आज येथे असल्या समारंभामध्ये भाषण करावें लागेल याची मला कल्पना हि नव्हती. तथापि आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल मी आपला फार आभारी आहे. मीं कोर्टात डिफेन्स केला, तो एकंदर वर्तमानपत्र- कारांच्या वतीने केला. पण तो त्यांना विचारून केलेला नव्हता. तथापि त्यांना तो पसंत पडला आहे असे अनेक वृत्तपत्रांतील लेखांवरून दिसत आहे, याबद्दल मला आनंद वाटतो. असल्या खटल्यांत डिफेन्स वगैरे कांहीं करूं नये, असे म्हणणारांचा एक वर्ग आहे. पण त्या सात्विक वर्गातील मी नाहीं हें मी कबूल करतों. या खटल्याचा निकाल काय होणार हैं ठरलेलेंच होतें व होईल ती शिक्षा भोगल्यावांचून सुटकाच नव्हती. तेव्हां शिक्षा भोगण्याचा निश्चय करूनच मी आपला डिफेन्स दिलाM
के. ख... ६