पान:केसरीवरील खटला.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुण्याची जाहीर सभा

७९

प्रमाणें सावधगिरीचे बूट-जोडेहि पायांत घालीत असतो. पण अशाहि स्थितींत साप, विंचू हे क्वचित् दंश करणारच. मी १९१० फेब्रुवारीपासून आज- तागायत सुमारें १३॥ वर्षे केसरीचा संपादक आहे. या अवधीत मजवर एकच खटला झाला ही गोष्ट मी सुदैवाची समजतों. ह्रीं वर्षे प्रेस अॅक्टाच्या व महायुद्धादि इतर कारणांनीं कशा प्रकारचीं होतीं हैं आपण जाणतांच.

 खटला झाला असतां माझा मीच बचाव करणें ही गोष्ट अगदीं स्वाभाविक अशीच होती. त्यांत मीं विशेष असें कांहीं केलें नाहीं. मी या कामीं अयोग्य अभिमान धरला नव्हता व योग्य अभिमान टाकला नव्हता. • स्वतः मी एल्एल्. बी. आहे व त्या धंद्यांत असतो तर वकिली केलीच असती. माझे सहकारी वकील लोक वकिली करतात तें पाहून मलाहि या वेळीं एक वेळ वकिली करण्याची हौस आली असेंहि क्षणभर मानलें तरी त्यांत वावगें तें काय ? खेळ पाहत शेजारी बसणारा मनुष्य एकादे वेळीं · स्वतः हातांत डाव घेऊन खेळणारच. शिवाय या कामीं माझ्या धंद्यानें मला वकील - पत्र दिले आहे असेंहि मनांत वाटू लागले. तथापि धंदेवाईक चकिलांपेक्षां मी खटला चांगला चालवीन अशी अहंकारबुद्धि मीं धरली नव्हती. स्वतः काम चालविण्यांत थोडासा तोटाच आहे हे मी जाणत होतों. पण सार्वजनिक दृष्टीने त्यांत तितका नफाहि होता. परकी राज्यांत जितक्या रीतीनें व प्रसंगी आपल्यांतील सुशिक्षित लोक गुणानें, कर्तृत्वानें व बुद्धीनें साहेबलोकांची बरोबरी करून दाखवितील तितका जनतेला आत्मविश्वास व हिंमत अधिक येईल. हायकोर्ट जज्ज झाले म्हणून काय झालें, आपण त्यांच्याहून स्वतःला कमी मानण्याचे कारण नाहीं, व हायकोर्ट जज्जांशीं बरोबरीच्या नात्यानें वागल्याचा हा प्रसंग साधावा म्हणूनच मी स्वतः काम चालविलें,

 हा खटला हे माझ्या धंद्यांतील एक आनुषंगिक जोखीम होतें. पण समाजांतील असा कोणता धंदा आहे कीं ज्यांत त्याच्या अनुषंगाने येणारें जोखीम नाहीं ? म्हणून इतर कोणाहि धंदेवाल्यापेक्षां या खटल्यांत अधिक धैर्य मीं दाखविलें असे मला वाटत नाहीं. पण जनता ही आम्हां वर्तमान- पत्राच्या धंद्यासंबंधानें विशेष उदार असल्यामुळे मीं सांभाळलेल्या जोखिमे- पेक्षां, किंवा मला झालेल्या दुखापतपिक्षां मला जनतेनें सहानुभूतीच्या