पान:केसरीवरील खटला.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

·  नामांकित वकिलालाहि काम चालवितां आलें नसतें. ऐन वेळी केळकरांनीं उदात्त प्रसंगाला उदात्तपणें तोंड देऊन स्वतःची सरशी केली असें मुंबईचे एक वकीलच मजजवळ म्हणाले, व तें सर्वथैव योग्य व लोकमान्यांच्या परंपरेला धरूनच होतें.

 शेठ किसनदास विष्णुदास म्हणाले, लोकमान्यांच्या मागें केसरी कसा चालेल असा एकदां प्रश्न निघाला असतां तात्यासाहेब म्हणाले, त्याची सर्व:व्यवस्था झाली आहे. त्या गोष्टीचें सत्यत्व मला आतां समजून आलें !

 नारायणराव गुंजाळ म्हणाले, तात्यासाहेबांनीं वर्तमानपत्रकारांची -बांजू उत्तम मांडलीच; परंतु शेतकरी व वारकरी यांचीहि बाजू उत्तम रीतीनें मांडली. मयत अर्जुना हा शेतकरी, वारकरी व मतदार होता. शेतकरी, वारकरी, जि. लो.बोर्डाचा सभासद व मुंबई कौन्सिलचा सभासद या नात्यानें श्री० तात्यासाहेबांचें मी अभिनंदन करतों. 'धरीन त्याचा अभिमान, करूं आपले जतन' या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणें लोकमान्य जनतेचे अभि मानी होते व ती परंपरा श्री० तात्यासाहेबांनीं उत्कृष्टपणें चालविली आहे.

 श्री० बाबूराव फुले म्हणाले, या खटल्याने हायकोर्टाचेंहि काम कसें चालतें हैं जनतेला आपोआप कळून आलें. केळकरांना दंड करून हाय- कोर्टानें अब्रू विकत घेतली खरी !

 श्री त्र्यंबकराव आवटे म्हणाले, तात्यासाहेबांनी लोकांची बाजू उत्तम लढविली. लोकमान्य इंग्रजांशी लढत हीच भावना अज्ञानी लोकांची असे.. त्यांच्या पश्चात् केळकरांनीं ती लढाई चालविली आहे. खटल्याची हकीकत वाचीत असतां लोकमान्य अवतरले की काय असाच मला पदोपदीं भास होई.

 याप्रमाणें भाषणे झाल्यावर श्री० केळकर यांस पुष्पहार समर्पण केल्यावर आभार मानतांना ते म्हणाले -

 आपण प्रेमानें माझा माझ्या योग्यतेहून अधिक गुणगौरव केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मजवर हा खटला यहच्छेनें झाला; तो अमक्यातमक्यानें आकसानें केला असें मी म्हणत नाहीं. आम्हां वर्तमानपत्रकारांचें जीवित म्हणजे एक प्रकारें वनवासच आहे. कायद्याच्या रानांत खटल्यांचे विंचू, इंगळ्या, साप चावरत असतां आम्हीहि त्यांच्यामध्येच वावरत असतों व आपल्या अकले