पान:केसरीवरील खटला.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
केसरीवरील खटला

म्हणजे कोणीकडून तरी तुरुंगांत जावें म्हणून मुद्दामच कांहीतरी लिहून तुरुंगवास ओढवून घेणें. पण वर्तमानपत्रकार हा कायद्याच्या दृष्टीने प्रवाह- पतित असतो, त्याला केव्हां शिक्षा भोगावी लागेल याचा नेम नसतो, येवढेच मनांत बाळगून जेव्हां तो प्रसंग येईल तेव्हां तो आनंदानें स्वीकारणे हा दुसरा मार्ग होय. असो. आपण सर्वांनीं मजविषयीं सहानुभूति दाखविली तिजबद्दल मी आपले आभार मानून आपले भाषण पुरे करतो."

पुण्याची जाहीर सभा

 केसरीवरील झालेल्या खटल्यांत श्री० न. चिं. केळकर यांनी लोक- पक्षाच्या व वृत्तपत्रांच्या वतीनें हायकोर्टात आपली बाजू धैर्यानें उत्कृष्टपणें लोकमान्यांची परंपरा राखली याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठीं ता. १५ रोजी सायंकाळीं श्रीशिवाजी-मंदिरांत पुणे शहरच्या नागरिकांची जाहीर सभा श्री० भास्कर बळवंत भोपटकर यांचे अध्यक्षतेखालीं भरली होती. आपल्या प्रास्ताविक भाषणांत अध्यक्ष म्हणाले, गेलीं दोनतीन वर्षे देशांत आळीमिळीचें जें खूळ पसरलें होतें त्यास श्री० तात्यासाहेब बळी न पडतां त्यांनी हायकोर्ट लढावले व 'कर्मण्येवाधिकारस्ते' ही लोकमान्यांची परंपरा त्यांनी अबाधित राखिली याबद्दल त्यांचें आपण अभिनंदन करीत आहों.

 यानंतर ल. ब. भोपटकर यांनी आपल्या भाषणास सुरुवात करतांना लोहगांवच्या खटल्याची सविस्तर हकीकत सांगून त्यांतून केसरीवरील खटला कसा निघाला याची माहिती सांगितली. ते म्हणाले, डि. मॅजि- · स्ट्रेट मि. माँटिथ यांनी स्वतः बंदूक तपासून पाहिली व पुष्कळच जोरानें चाप दाबल्याखेरीज बंदूक उडणें शक्य नाहीं असा आपला अभिप्राय • नमूद केला, तरीहि ज्यूरीनें वॉकर यास निर्दोषी ठरविलें ! जखमी झालेले इसम व मयत अर्जुना यांच्या आप्तेष्टांना नुकसानभरपाईदाखल पोटगीची तरी कांहीं व्यवस्था केली आहे काय ? असा प्रश्न मुंबईकौन्सिलांत विचारला असतां लष्करीखात्यावर आमचा ताबा नाहीं, तो प्रश्न वरिष्ठ सरकारचा