पान:केसरीवरील खटला.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुंबईची जाहीर सभा

७५.

तरी निश्चित झाली आहे. पण वर्तमानपत्रांच्या बाबतींत ज्यूरी वगैरेचा. कांहींएक अधिकार आपणांस नसल्याने आपण सर्वस्वीं पराधीन आहों. पण हें स्वातंत्र्य मिळवावयाचें तर तें जोराच्या प्रयत्नाशिवाय मिळणार नाहीं. या बाबतींत एमर्सन नामक तत्त्वशाचें एक वाक्य आपणांला सांगतों. 'ए रिव्हर मेक्स इट्स ओन वेड' म्हणजे 'नदी आपलें पात्र आपणच निर्माण करते'. नदीला तिचें पात्र दुसरा कोणी निर्माण करून देत नाहीं. तिच्या अंगांत जोर असेल तर त्या प्रमाणाने तिला लहान अगर मोठें पात्र लाभतें जमीन भुसभुशीत मिळाली तर नर्मदा नदी आपलें पात्र अर्ध मैल रुंद खणते, पण वाटेंत विंध्याद्रीसारखा पर्वत आला तरी ती त्यांतून आपला मार्ग काढल्याशिवाय राहत नाहीं; मात्र खडक कठीण म्हणून येथें ती लहान पात्रावर आपले समाधान करून घेते. परंतु पात्र लहान म्हणून तिचें पाणी वाहून जाण्याचें रहात नाहीं, तर उलट इतर ठिकाणांपेक्षां अधिक जोरानें व खळखळीनें वाहात असतें.

 "मला या विषयावर आज अधिक बोलण्याची इच्छा नाहीं. सर्व वर्तमान- पत्रकारांना त्यांच्या धंद्याच्या अनुषंगानें अशी जोखीम पत्करावीच लागते. पण मी माझ्या धंद्याची नसती प्रौढी मिरवूं इच्छीत नाहीं. असा कोणता धंदा आहे कीं त्याचें म्हणून विशेष जोखीम नाहीं ? गवंडी चार-चार मजल्या- पर्यंत परांचीवर बसून भिंती बांधतो. मग जन्मभर हा धंदा करणाऱ्या गवंड्याच्या मनांत केव्हां कधींच असें आलें नसेल काय की आपण उंचावरून पडूं व आपणास दुखापत होईल व ती सोसावी लागेल ? त्याच रीतीनें गेल्या तीस वर्षांत ज्या ज्या संपादकांनी आपल्या नांवाचें डिक्लेरेशन करून वर्तमान- पत्रे, विशेषतः राष्ट्रीयपक्षाच्या धोरणाची पत्रे चालविलीं, त्यांना आपणावर तरी राजद्रोहाचा किंवा इतर खटला होऊन आपणांस तुरुंगांत जावें लागेल अशी कल्पना असणारच. ही कल्पना डोळ्यापुढे असतांहि जो तें काम करतो त्याला तितक्यापुरतेंहि धैर्य नाहीं असे म्हणणे किंवा मानणें हें स्वतः म्हणणाराच्या किंवा मानणाराच्या मूर्खपणाचेंच निदर्शक ठरेल ! टिळकांसारखे मनोधैर्याचे अर्थात् थोडेच सांपडणार. परंतु आपल्या धंद्याला लागणारें सामान्य प्रतीचें धैर्य हें ज्याला त्याला असतेंच. आतां धैर्य दाखवि- ण्याचा अलीकडचा एक मार्ग निघाला आहे; तो अनुसरावयाचा म्हटला