पान:केसरीवरील खटला.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबईची जाहीर सभा

७३

शिशुवाङ्मयांतील ही गोष्ट मीं एरवीं तुम्हांला सांगितली नसती. पण जमना- दास यांनी इंग्रजीत तिचा उल्लेख केला, व तिचें खरें स्वारस्य तुम्हांला कळावे म्हणूनच ती मराठीत सांगितली. गोष्टीचा मुद्दा इतकाच,कैदेच्या शिक्षेच्या बाबतींत सोळा वर्षांनी माझी बढती व्हावी असा माझाव सर्वोचा जो अंदाज होता तो मात्र फसला. कदाचित् माझें वय ५०/५२ वर्षांबर आहे म्हणून न्यायमूर्तींनीं मला कैदेची शिक्षा दिली नसेल, कदाचित् सरकारला आज पैशाची अधिक जरूरीहि असेल ! कारण एका दिवसांत माझे ५२०० व विनोदपत्राचें १८०० मिळून ७००० रुपयांची रक्कम सरकारनें मिळविली ! केसरीचा दंड लोकांनीं भरावा असे उदार उद्गार कित्येकांनी येथें काढले त्याबद्दल मी फार आभारी आहे. परंतु तो दंड केसरीनें कालच भरून टाकला. या दंडाच्या बाबतींत विनोद पत्राच्या मुद्रकाला मात्र उगाच कडकपणे वागविण्यांत आलें. त्या बिचाऱ्याचा लेखाशीं काय संबंध ? शिवाय त्यानें माफी मागितली होती. व ती स्वीकारण्या बद्दल सरकारी वकिलांनींहि शिफारस केली होती.म्हणून लोकांना या कडक शिक्षांची चीड आली असेल तर प्रथम या बिचाऱ्या मुद्रकाचा दंड भरण्याला त्याला लोकांनी मदत करावी. विनोद पत्रांत मजविषयीं कसे लेख येतात हें आपणांस माहीत आहेच. पण न्यायकोर्टाच्या अशा या दडपशाहीनें तें पत्र बुडावें हे मला पसंत नाहीं.म्हणून आपण कोणीं त्याला मदत केली तर बरें होईल. कारण अशानें त्याच्यांतील दोष निघून जाऊन ते आपल्या पक्षालाहि कदाचित् मिळेल.

 “ असो. कोर्टाच्या बेअदबीचा गुन्हा कशा प्रकारचा आहे हे आतां आपल्या लक्षांत आलेच असेल. कोर्टानें खटला भरला की माफीशिवाय आरोपीला सुटकाच नाहीं, अशी कोर्टानें आपली समजूत करून घेतलेली दिसते. म्हणूनच जुलमानें माफी घेणें किती अप्रशस्त आहे, हें मीं परवां कोर्टास सांगितलें. चोरानें खिंडींत गांठून लिहून घेतलेली पावती, आणि न्यायकोर्टानें जन्मभर तुरुंगांत ठेवण्याचा धाक दाखवून सक्तीनें मिळविलेली माफी यांत कांहींच फरक नाहीं. पण आरोपीनें माफी न मागितली तर 'त्याला जन्मभर कैदेत ठेवण्याचा अधिकार कोठला, याची उपपत्ति लक्षांत आणा म्हणजे या चमत्काराचें खरें मर्म कळून येईल. ती उपपत्ति म्हणजे