पान:केसरीवरील खटला.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबई जाहीर सभा

६७

च केळकर ह्यांचें निरीक्षण करण्याचा प्रसंग ज्यांस अनेकवार आला असेल त्यांचाहि झाला असेल, मात्र केळकरांस लोकमान्यांविषयीं फार आदर होता तरी देखील त्यांनी आपली सदसद्विवेकबुद्धि त्यांच्या स्वाधीन केली नव्हती. उदारमतवादीपणा आणि स्वतंत्र विचारसरणी ह्यांबद्दल केळकरांविषयीं त्यांच्या प्रतिपक्षासहि आदरभाव वाटतो. मी 'मराठा' पत्र कित्येक वर्षे वाचीत आहे आणि त्यांतील मतें जितक्या वेळां मला पसंत पडलीं तितक्या- च इतर वेळां तीं नापसंतहि वाटलीं. पण एक गोष्ट मला पटली ती ही कीं, त्यांतील मतें व भावना हे जिवंत प्रवाह असून इतर माणसांच्या कल्पनांच्या त्या निवळ नकला नाहींत.

 श्री० केळकर हे लोकमान्यांचे परम योग्य सहकारी होत, आणि हा मान- हिंदी वर्तमानपत्रकार ह्या दृष्टीनें कोणासहि अत्यंत मोठा होय. ज्या प्रख्यात पुढाऱ्याचा चतुर्थ स्मृतिदिन गेल्या आठवड्यांत साऱ्या देशभर मोठ्या उत्साहानें पाळण्यांत आला, त्या पुढाऱ्याचीं खरी मतें जर कोणाच्या तोंडून ऐकावयास मिळतील तर ती कळकरांच्या तोंडूनच होत अशी देशाची खातरी झाली आहे. संपादकाच्या खुर्चीवरून ते आतां असेंब्लीतील पदावर चढले आहेत. ह्या नवीन क्षेत्रांतहि त्यांचें तेज चांगलें पडो असें मी इच्छितों.

 हायकोर्टाच्या एका निकालावर केसरींत कांहीं टीका येऊन त्यामुळे कोर्टाची बदनामी झाली अशा गुन्ह्याबद्दल केळकरांस जबर दंड झाला आहे. न्यायाधीश हेच कायद्याचा अर्थ करण्याचे अधिकारी असल्यामुळे त्यांनी केलेला ५००० रुपयांचा दंड योग्य की अयोग्य ह्याचा विचार आपणांस करता येत नाहीं. तथापि वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यास हा 'अपमाना'चा कायदा फार नडतो असें वृत्तपत्रकार ह्या नात्याने म्हटल्याशिवाय माझ्याच्यानें राहवत नाहीं. लोकमत प्रतिबिंबित करण व त्यास वळण लावणे ह्या दोन गोष्टी वर्तमानपत्रास करावयाच्या असतात.लोकांचा असंतोष व्यक्त करण्याचा निरुपद्रवी मार्ग ह्या दृष्टीने वर्तमानपत्रे करीत असलेले लोकमतप्रतिपादनाचें कार्य अत्यंत महत्त्वाचें होय. हें कार्य वर्तमान- पत्रे न करतील तर लोकांतील असंतोष कभी निरुपद्रवी मार्गाने बाहेर पडल्यावांचून राहणार नाहीं. लोकांत पसरलेला असंतोष कांहीं काल्पनिक