पान:केसरीवरील खटला.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
केसरीवरील खटला

ती गोष्ट मी ताबडतोब कबूल केली. कारण केळकर आणि मी हे वर्तमान- पत्रांच्या ज्या मनूचे प्रतिनिधी आहोत तो मनु पालटत चालला आहे. लो० टिळकांच्या उलाढालींच्या कारकीर्दीतील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांवर केळकर ह्यांनी आपल्या 'मराठा' ह्या इंग्रजी पत्रांतून वेळोवेळी जे अनेक लेख लिहिले आहेत, त्यांचा संग्रह मद्रासच्या गणेशन् कंपनीनें प्रसिद्ध केला आहे तो मी सध्यां वाचीत आहे. तो वाचीत असतां श्री• केळकर ह्यांनीं वरील लेखांतून आपल्या नांवाचा उल्लेख एकाच ठिकाणी केला आहे हे पाहून त्यांच्या विनयशीलतेची साक्ष मला पटली. तो उल्लेख केळकर ह्यांनी लोकमान्यांच्या ज्युबिलीवरील आपल्या लेखांत केला आहे. १८९६ च्या मार्च महिन्यांत लोकमान्य टिळक ह्यांनी केळकर यांना आपणास येऊन मिळण्याविषयीं लिहिले. त्या पत्रांत लोकमान्य म्हणतात, मला तुम्ही माझ्या शेवटच्या दिवसांत नोकर म्हणून नव्हे तर मित्र म्हणून हवे आहां. हे दिवस कदाचित् माझ्या आयुष्याचे शेवटचेहि असतील." ह्या पुस्तकानें माझ्या मतें श्री० केळकर व लो० टिळक ह्या व्यक्तींचे अंतरंग आपणांस पाहावयास मिळेल.

 श्री० केळकर हे आज २८ वर्षे वर्तमानपत्राचा धंदा करीत आहेत. ह्या 'धंद्यांत माझींहि तितकींच वर्षे गेली आहेत. आमच्यासारख्या वर्तमानपत्र- कर्त्यांचा मनु जात चालला आहे हे मीं केळकर ह्यांस प्रारंभीच सांगितलें आहे. त्या मनूस काय नांव द्यावे ह्याबद्दल मला नेमका शब्द सांपडत नाहीं. तथापि सध्यांच्या वर्तमानपत्रकारांस धंदेवाइकांचा मनु म्हटले तर आमच्या मनूस मिशनऱ्यांचा मनु म्हणतां येईल. अशा माणसांस वर्तमानपत्रांचा एरवीं उपयोग नाहीं व वर्तमानपत्रांना अशा माणसांचा इतर उपयोग नाहीं; उपयोग असलाच तर तो एवढाच की, त्यांना आपला आत्मप्रत्यय वर्त- मानपत्रांतून मांडावयास मिळतो. लो. टिळक ह्यांचे वर्णन कितीहि पानांतून केले तरी त्याला, लोकमान्यांनी केळकरांस लिहिलेल्या पत्रांत जें वर्णन उमटलें आहे त्याची सर येणार नाहीं. माणसांचे अंतरंगाचा ठाव काढण्याची केवढी विलक्षण शक्ति लोकमान्यांत होती हे त्या पत्रावरून चटकन् लक्षांत येतें.लोकमान्यांचे जिवलग स्नेही ह्या नात्याने केळकरांचें नांव पुढील पिढ्या घेतील हा माझाच एकट्याचा ग्रह आहे असे नव्हे; तर लोकमान्यांचें