पान:केसरीवरील खटला.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभांची हकीगत मुंबईची जाहीर सभा रविवार, ता. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजतां मारवाडी विद्या- लयांत मुंबईच्या नॅशनल युनियनतर्फे जाहीर सभा भरली होती. केळकरांनीं हायकोर्टातील खटल्यांत केलेली 'उत्कृष्ट कामगिरी व दाखविलेलें मनोधैर्य,' तसेच आजपर्यंत 'वर्तमानपत्राच्या द्वारे त्यांनी केलेली उत्कृष्ट देशसेवा' यांबद्दल त्यांचे अभिनंदन व गौरव करणें, हा या सभेचा हेतु होता. सभा भरविण्याची कल्पना प्रथमच रविवारी सकाळी जाहीर झाली तरी सभेच्या आधीं सुमारें २ तास विद्यालयाचा दिवाणखाना भरून जाऊन, तेथें सभा करणें अशक्य म्हणून बाहेरच्या पटांगणांत ती भरवावी लागली. तरीहि सर्व जागा भरून खिडक्या, कठडे, भिंती, आसपासच्या इमारती यांतून प्रेक्षक बसले होते; व श्रोतृसमुदायाच्या निम्याहून अधिक गर्दी स्थलसंकोचामुळे परत गेली. प्रारंभी श्री० अण्णासाहेब नेने यांनी सूचना केल्यावरून ‘इंडियन सोशल रिफार्मर'चे संपादक श्री० नटराजन् यांनीं अध्यक्ष या नात्यानें पुढीलप्रमाणें भाषण केले. के. नटराजन यांचें भाषण श्री० न. चिं. केळकर ह्यांनी हिंदुस्थानांतील वर्तमानपत्रांच्या सांप्रदायाची जी सेवा केली आहे तिजबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याकरितां आजची सभा भरविण्यांत आली आहे. श्री० मंडलिक ह्यांनी मला अध्यक्ष होण्याबद्दल विनंति केली पण ती मान्य करूं नये असें प्रथम माझ्या मनांत आले. ह्याचे कारण असें कीं, सार्वजनिक कार्यात श्री० केळकर ह्यांच्याशीं अधिक निकट संबंध आलेले गृहस्थ अनेक आहेत, त्यांपैकी कोणास आजच्या प्रसंगीं अध्यक्षस्थान देण्यांत आलें असतें तर अशा अध्यक्षाचे भाषणांत केळकरांच्या प्रत्यक्ष ओळखीचा, आणि त्यांच्या कामगिरीबद्दल अधिकारयुक्त असा उल्लेख स्वाभाविकच आला असता. परंतु वर्तमानपत्रकार ह्या नात्यानें मीं आज अध्यक्ष व्हावयास पाहिजे असे जेव्हां मला मागाहून सांगण्यांत आले तेव्हां के. ख.... ५