पान:केसरीवरील खटला.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
केसरीवरील खटला

 जन्मभूमि (मच्छलीपट्टण ) - दडपशाहीचीं नवीं साधनें तयार करणें अधिकाऱ्यांच्या हातचा मळ आहे. एक भूत गाडलें तर दुसरीं सात भुतें राजकारणांत नाचूं लागलीं! प्रेस ॲक्टाची आपत्ति टळली तो जामिनकी व बेअदबीच्या आपत्ति हजर आहेतच !

 बारामती - समाचार ( बारामती ) – लोकमान्यांचे पश्चात् त्यांचें नांव महाराष्ट्रांत श्री० तात्यासाहेब केळकरांनी राखले ही गोष्ट निःसंशय आहे. त्यांनी चालविलेल्या खटल्याने सर्व वृत्तपत्रकर्त्यानींहि बराच बोध घेण्या- सारखा आहे व त्यामुळे त्यांनीं व सर्व महाराष्ट्रीयांनी यावेळी श्री. तात्यासाहेब यांचें अभिनंदन करणें उचित आहे.