पान:केसरीवरील खटला.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला व लोकमत

हा मोठाच घाला आला आहे, व राष्ट्रीय पत्रांसंबंधानें हेच धोरण चालू ठेवल्यास ती पत्रे 'निर्वाणपदाला' जाण्यास फारसा कालावधि लागणार नाहीं. श्री० केळकर यांनी स्पष्टपणे सांगितलें कीं, 'माझी टीका न्यायदानाच्या पद्धतीवर आहे.' युरोपियन व हिंदी असा भेद आला असतां न्यायपद्धति सदोष होते असें खुद्द लॉर्ड रोडिंग यांनी म्हटलेले आहे. लोकांच्या हक्कांवर व वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे. कोणत्याहि स्वतंत्र देशांत असा प्रकार घडत नाही. परंतु नोकरशाहीच्या शस्त्रागारांत अनेक शस्त्रास्त्रे सज असून या नाहीं त्या शस्त्रानें वृत्तपत्रांचें कंदन करणे एवढाच तिचा उद्देश दिसतो.

 फॉरवर्ड ( कलकत्ता ) – कायद्याचा अर्थ करण्याच्या पद्धतीनें तो अर्थ इतका कडक झाला आहे कीं, हिंदुस्थानांतील आपल्या देशबांधवांचें खरेखुरें कल्याण करणाऱ्या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य नष्टच होण्याची वेळ आली आहे.

 स्वातंत्र्य ( कलकत्ता )- एकादा गोरा आरोपी न्यायकोर्टानें निर्दोषी म्हणून सोडला तर त्यावर वृत्तपत्रांनीं कांहींच टीका करतां कामा नये १ गोरी ज्यूरी निःपक्षपातीपणानें काम करती तर प्रश्नच नव्हता. पण आतां - पर्यंत असे खुनी आरोपी त्यांच्या हातून कितीतरी सुटले आहेत. प्रकारें जीव व मालमत्ता असुरक्षित राहून कसे चालेल, या प्रश्नाचा वृत्तपत्रे जरूर विचार करतील अशी आशा आहे.अशा

 हिंदू ( मडगांव ) – केळकरांची कैफीयत म्हणजे इंग्लिशांच्या हिंदु- स्थानांतील न्यायपद्धतीचे दोष दाखविणारा एक उत्तम निबंधच आहे. हिंदुस्थानच्या सदोष न्यायपद्धतीवर केळकरांनी केसरींतून जितकी निर्भीड टीका कदाचित् केली नसती, तिच्यापेक्षा कितीतरी अधिक पट स्पष्टोक्ति- पूर्ण टीका त्यांनीं भर न्यायकोर्टात केली असे म्हणण्यास हरकत नाहीं. केळकरांनी हें जें अति महत्त्वाचें काम बजावले त्याबद्दल त्यांचे सर्व वर्तमान- पत्रकार व अखिल राष्ट्र अभिनंदनच करील.

 लोकपक्ष ( बेळगांव ) - जितांच्या जागृतावस्थेत जेत्यांचें मरण असल्य हीं जागृतीचीं साधनें शक्य तितकों अडचणीत आणण्याची सोय कायदे- बुकांत करण्यांत आली आहे. अशांपैकींच एका कलमाच्या जोरावर दे० भ० केळकर यांस दंड ठोठावण्यांत आला.