पान:केसरीवरील खटला.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
केसरीवरील खटला

व बाहेर अंधार राखून फक्त एका म्हणजे लेन्सच्या भिंगाच्या द्वारें येईल तितकाच प्रकाश आंत घेतात, त्याप्रमाणें न्यायमूर्तींनीं आपण अवांतर सर्व गोष्टींविषयीं अज्ञान किंवा विस्मरण ठेवून वरील अर्थमीमांसेच्या द्वारे येणाऱ्या प्रकाशानेंच केळकरांच्या गुन्हेगारीसंबंधाचे चित्र आपल्या मनांत प्रगट करूं देऊं असें सकृद्दर्शनी ठरविलें होतें. शिवाय खटला समरी पद्धतीनें चालावयाचा असल्यानें कोर्टापुढे सरकारी वकिलाचा अर्ज, केसरींतील आक्षिप्त लेख, व केळकरांचा प्रतिज्ञालेख यांशिवाय पुरावा असा कांहींच नव्हता. असे असतां न्या. किंकेड पुण्यास असल्यावेळेपासूनची त्यांची केसरीसंबंधानें माहिती व केसरीच्या आजच्या वाचकांच्या संख्येविषयींचीं अनुमानें हीं त्यांनी आपला निकाल लिहितांना उपयोगांत आणिलीं हैं योग्य कसे ठरतें ? हायकोर्ट ही डिबेटिंग सोसायटी किंवा कायदे कौन्सिलची सभा नाहीं हें जितकें खरें, तितकेंच हायकोर्टाचा न्यायाधीश हा गुप्त पोलीस नव्हे हेंहि खरें असले पाहिजे ! 'पण धन्याचा धणी कोण' या प्रश्नाइतकाच न्यायाधीशाचा न्यायाधीश कोण, हा प्रश्न निरुत्तर म्हणून खेदजनक ठरतो.

 न्या. मार्टेन यांनी तर याहिपुढे मजल मारली. " वॉकरच्या खटल्यांत न्या. मॅकलाऊड व फॉसेट यांनी दिलेला निर्णय जितक्या प्रकारांनी व जितका अधिक चूक आहे असे मी दाखवूं शकेन तितका माझ्यावरील आरोप हलका होऊन या न्यायमूर्तीवरील जबाबदारीचें पारडें अधिक जड होईल हे मला माझ्या बचावाकरितां दाखविले पाहिजे" असें श्री० केळकर आग्रहानें प्रतिपादीत असतां, ती गोष्ट न्यायमूर्तींनी त्यांना करू दिली नाहीं. " तो निकाल वाटेल तर तुम्ही चूक म्हणा, परंतु तो वस्तुतः चुकीचा होता कीं बरोबर होता हैं ठरविण्याचें काम आमचें नाहीं" असे न्यायमूर्तींनी त्यांना सांगितले. परंतु अखेर निकाल देतांना हायकोर्टाचा पूर्वीचा निकाल बरो- बरच होता हैं शाबीत मानण्यास त्यांनी कमी केले नाहीं. श्री० केळकरांना हत्यारें वापरण्याची माहिती नाहीं ही कबुली स्वतः केळकरांनीच दिली होती; पण न्या. मॅकलाऊड यांनी जन्मभर अशीं हत्यारें वापरलीं असल्यानें त्यांना वॉकरची बंदूक कशी उडाली असेल याचें बिनचूक अनुमान करतां येण्यासारखें होतें अशा अर्थाचें जें विधान न्या. मार्टेन यांनी केले आहे त्याला पुरावा कोणता ? न्या. मॅकलाऊड हे कांहीं साक्षीच्या पिंजऱ्यांत