पान:केसरीवरील खटला.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटल्यावरील केसरीचें मत

हेतु तुम्हांला या खटल्यानें साधावयाचे होते ते तुम्हांला खरोखर साधतां आले काय ?" असो. प्रस्तुत खटल्याची चर्चा येथें सोडून देऊन पुढील लेखांत न्यायकोर्टाच्या बदनामीच्या कायद्याच्या सर्वसामान्य चर्चेकडे वळू.

-२-

 न्या. मार्टेन व न्या. किंकेड यांनी बेअदबीचा गुन्हा शाबीत धरून केसरीला जबर दंड ठोठावला यांत लोकांना जरब लावण्याचा त्यांचा हेतु साधला असेल, परंतु न्यायकोर्टाच्या न्यायदानपद्धतीवर जनतेचा पूर्ण विश्वास प्रस्थापित करावा हा त्यांचा दुसरा हेतु तितका साधला असे मानतां येणार नाहीं, याविषयीं मागील लेखांत आम्हीं दिग्दर्शन केलेंच आहे. न्यायमूर्तींनी दिलेला निकाल त्यांच्या मताप्रमाणे बरोबर असला तरी आमच्या मताप्रमाणें तो तितका बरोबर कां वाटत नाहीं, तसेंच खटल्याचें काम चालू असतां ज्या कित्येक गोष्टी त्यांच्या नजरेला आणणें जरूर होतें त्या आणण्याच्या प्रयत्नांत श्री० केळकर यांना अडथळा कसा झाला व तो अयोग्य कां होता, या गोष्टींचें आज आम्ही थोडक्यांत विवेचन करणार आहों.

 याच पुस्तकांत पृष्ठ ४२ व पुढें लोहोगांव येथे घडलेला प्रकार व त्यानंतर त्यांतील गुन्हेगारीसंबंधानें निरनिराळ्या न्यायाधिकाऱ्यांची मतें आम्हीं एकत्र दिलीं आहेत; त्यावरून वाचकांच्या ध्यानांत प्रथम ही गोष्ट येईल कीं, न्या. मार्टेन व किंकेड यांनी केळकर यांना आपल्या बचावाच्या भाषणांत अवांतर गोष्टी आणण्यास प्रतिबंध केला असता त्यांनी स्वतः मात्र तें बंधन मानलें नाहीं ही आश्चर्याची गोष्ट होय ! केळकरांचे भाषण चालू असतां न्यायमूर्तींनी असे दर्शविलें कीं, या खटल्यांत अजाणत्या पक्ष- पाताची केळकरांनी दिलेली कबुली व जाणत्या सहेतुक पक्षपाताचा सर- कारी वकिलांनी केलेला आरोप, या दोन बिंदूंच्या दरम्यान जे पडूं शकेल तेवढेंच कोर्टास ग्राह्य मानतां येईल; इतर सर्व गोष्टी गैरलाणू मानल्या पाहिजेत. या दोन बिंदूमध्यें आक्षिप्त लेखाच्या शब्दांची सशास्त्र अर्थ- मीमांसा एवढीच गोष्ट उरूं शकते. पण तीहि खरोखर समर्पक व्हावयाची तर लिहिणाराच्या मनःस्थितीवर ज्या अवांतर गोष्टींचा परिणाम झाला त्याहि ळक्षांत घ्यावयास नकोत काय ? परंतु फोटोग्राफ काढतांना कॅमेऱ्याच्या आंत