पान:केसरीवरील खटला.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सेशन्स जज्ज यांचा अभिप्राय

फिरला. त्याचे ढुंगणाशी त्याची बंदूक असतां त्यानें ती आपल्या दोहों हातांत धरली होती, त्याचें बोट बंदुकीच्या चापावर ठेवलेलें होतें, व बंदुकीचा रोख सामान्यतः गांवकऱ्यांकडे होता; अशा स्थितीत त्यानें बंदुकीचा चाप ओढला. आरोपी तरुण आहे तरी तो शिपाई आहे. त्याला 'सर्व्हिस रायफल' वागविण्याची संवय आहे. त्याच्या हातीं या वेळीं होती ती बंदूक जवळ जवळ सर्व्हिस रायफलसारख्याच घडणीची होती. ती मी स्वतः हातांत घेऊन पाहिली तों मला असे आढळले कीं, बंदुकीचा चाप हलका नसून बराच जड आहे, व कदाचित् चार माणसांच्या हाताइतका भारी जोर त्यावर पडल्याशिवाय तो चाप पडणार नाहीं व गोळी सुटणार नाहीं. तेव्हां आपण इतक्या जोरानें चाप खेंचला, मात्र आपण काय करीत होतों याची शुद्धि आपणाला नव्हती, हें शात्रीत करण्याचा बोजा आरोपीवर होता. म्हणून मी असें घेऊन चालतों की, आपण प्राणघातक गोष्ट करीत आहो हें आरोपीस माहीत होतें, व या क्षणास तरी ३०४ कलमाखालच्या गुन्ह्याचा आरोप त्याजवर ठेवून मी त्याला इनसाफाकरितां सेशन्स कोर्टात पाठवितों."


सेशन्स जज्ज यांचा अभिप्राय

 ( अ ) ज्यूरीस खटला समजावून देतेवेळीं सेशन्स जज्ज वाईल्ड म्हणाले, आरोपीचें म्हणणें कीं, आपल्या बेशुद्धीनें म्हणजे जाणीव नसतां मीं चाप ओढला, बंदूक उडाली, आणि अर्जुना याला अपघातानें चुकून गोळी लागली. त्याचे साथिदार सोजीर हल्लीं हेच सांगत आहेत. परंतु त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात हें कांहींच सांगितलें नाहीं; व आतां आपल्या सोबत्याच्या बचावाकरितां ते तसे सांगत आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. शिवाय आरोपी म्हणतो तें संभवनीय आहे का,हे पाहा. या रायफल बंदुकीला तटणीचा कोयंडा आहे. तो उपयोगांत असेल वा नसेल, परंतु आरोपी हा सोजीर असून त्याला रायफल बंदूक वापरण्याची संवय आहे. अर्थात् त्याच्या मनांत असल्याशिवाय बंदूक उडाली हे आपण कसें खरें मानावें ? तो सांगतो तसा त्यावर गहजब झाला असला म्हणून तरी काय झालें ? त्यानें बंदूक उडविली ती