पान:केसरीवरील खटला.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
केसरीवरील खटला

१॥ तासानें मेला. गोळी उडतांच गांवकऱ्यांनीं सोजिरांमागे जाण्याचें टाकून दिलें व ते जखमी मनुष्याच्या भोंवतीं बसले. तेव्हां सोजीर कांहीं अडथळा न उरल्यानें बिनत्रासाने आपल्या बराकींना परत गेले व झालेली हकीकत त्यांनी अधिकाऱ्यांना कळविली.


जिल्हा मॅजिस्ट्रेट यांचा अभिप्राय

 “आरोपीचें म्हणणें, मीं आपल्या बचावाकरितां बंदूक झाडली, असे असेल तर तें त्याच्याच जबाबानें अग्राह्य ठरतें. आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासारखी स्थिति उत्पन्न झाली होती कीं नाहीं, किंवा आपल्यास इजा होईल असे मानण्यास त्याला सबळ कारणें होतीं कीं नाहीं, याचा विचार करण्याचे कारण नाहीं. एकंदर पुराव्यावरून असे दिसतें कीं, सोजिरांच्या मागे लागलेल्या लोकांची फार गर्दी नव्हती, व होते तेहि चवताळलेले व भय उत्पन्न करण्यासारख्या मनःस्थितीत नव्हते. शार्मनला पकडून उभा करणें हें कायदेशीर हक्कमर्यादेपलीकडे असले तरी, नंतरच्या त्यांच्या वागणुकीनें वरील गोष्टच सिद्ध होते. त्यांतील कांहीं लोक वयानें पोक असल्यामुळे, त्यांनी इतरांना अधिक रागावूं न देतां शांत करणे व थोपवून धरणें हें स्वाभाविक होतें; व तेंच त्यांनी बहुधा केलेंहि. फक्त भाषा वेगळी पडल्यानें आपण काय म्हणतों हे त्यांना नीट समजावून देतां न आल्यामुळे त्यांच्या ओरड्यानें थोडा गोंगाट झाला असेल; व भाषा समजेना म्हणून कृतीनें त्यांनीं सोजिरांचे अंगाला हात लावून थांबवून धरण्याचा प्रयत्न केला असेल.आरोपीचा गुन्हा ३०४ कलमाखालीं येत नाहीं. परंतु त्यानें गोळी झाडली त्या वेळी आपण काय करतों हें त्यास माहीत नव्हतें, किंवा भीतीमुळे आपण जें काय करतों त्याचे स्वाभाविक परिणाम त्याच्या लक्षांत क्षणभर न यावे, ही गोष्ट झालेल्या पुराव्यावरून खरी मानतां येत नाहीं. आधीं त्याला भीति वाटण्या- सारखी स्थितीच नव्हती. थोड्याच वेळापूर्वी लोकांच्या डोक्यावरून का होईना पण त्यानें जाणूनबुजून गोळी झाडली होती; व यानंतरहि लोक आपल्या मागें लगट करीत आहेत व आपणास सोडीत नाहींत असे पाहून तो मागें