पान:केसरीवरील खटला.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोहोगांव येथें घडलेली हकीकत
[ जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्या जजमेंटावरून घेतलेली ]

 ता. २९ नोव्हेंबर १९२३ रोजीं श्रॉपशायर लाइट इन्फन्ट्रीचे चौघे सोजीर लोहोगांव येथें शिकारीला गेले. त्यांचेजवळ शिकारीचा परवाना होता. या शिकारी मेळ्याचा मुख्य अधिकारी कॉर्पोरल शार्मन नांवाचा होता. इतर तिघांचीं नांवें रिचर्ड वॉकर, जॉन व्हाइट व जॉन वॉकर अशीं होतीं. त्यांचेजवळ एक टॅझिट मॅगेझिन रायफल, एक जोड नळ्यांची शिकारी बंदूक, व एक एकेरी नळीची शिकारी बंदूक होती; व हे सर्व शिकारी मिळून हीं सर्व हत्यारें लागतील तसतशी वापरीत होते. लोहो- गांवच्या हद्दींत गेल्यावर एक तळें लागलें, तेव्हां दोन शिकारी तळ्याचे एका बाजूनें व दुसरे दोन दुसऱ्या बाजूनें जाऊं लागले. शार्मन व जॉन वॉकर हे एका बाजूस पण एकमेकांपासून जरा दूर होते. शार्मन यानें एक बदक मारलें तें तळ्यांत पडलें. तें बाहेर काढण्याकरितां तळ्यांत शिरण्याबद्दल शार्मननें एका तरुण मराठ्याला सांधून पाहिलें. पण तो तळ्यांत शिरेना, कारण तळ्यांत शेवाळें माजलेले असून त्यांत शिरणें घातक आहे अशी गांवच्या सर्व लोकांची समजूत होती. त्यावरून बाचा- बाची झाली व शार्मननें त्या मराठ्याला ( नारायणाला ) मारलें; त्यामुळें त्याला तोंडावर थोडी दुखापत झाली. हे पाहून आसपास कांहीं लोक उभे होते त्यांना सहजच थोडा राग आला; व 'मला मारलें, मला मारलें" असें म्हणून नारायण ओरडूं लागला तेव्हां दुसरेहि कांहीं लोक धावूम येऊन कजांत सामील झाले. शार्मनला भीति वाटली व त्यानें इतर तिघां सोजिरांना हांका मारल्या. ते आल्यावर ते चौघे मिळून तेथून निघून जाऊं लागले. तेव्हां जमलेले गांवकरीहि त्यांच्या मागे चालले; व 'असे जाऊं नका, थांबा' असे म्हणून ओरडूं लागले. कांहीं वाट अशीच चालल्यावर शार्मननें आपली पडशी रिचर्ड वॉकर याचेजवळ दिली व तो स्वतः पळून जाऊं लागला. तेव्हां त्याचेमागे तिघे गांवकरी धावूं लागले व बाकीचे