पान:केसरीवरील खटला.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न्या. किंकेड यांचें जजमेंट

४१

 जस्टिस यांनी म्हटल्याप्रमाणें “अशा परिस्थितींत व अशा उद्देशानें प्रसिद्ध केलेल्या प्रतिकूल टीकेकडे कायद्यानें बारकाईनें पाहूं नये" हें खरें; पण याच न्यायमूर्तीच्या म्हणण्याप्रमाणे, केळकरांचा हा लेख म्हणजे 'टीका' त्याव्हे. ती व्यक्तिशः सरन्यायाधीश व न्या. फॉसेट यांची न्यायाधीश या बनात्यानें ग्राम्य निंदा आहे.

 या संबंधांत, यापूर्वी याच कोर्टाची बेअदबी केल्यामुळे केळकरांना एकदां शिक्षा झालेली आहे हहि मी विसरूं शकत नाहीं. केळकरांना ५००० रु. दंडव २०० रु. खर्चादाखल देण्याबद्दल झालेला हुकूम मलाहि मान्य आहे.