पान:केसरीवरील खटला.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
केसरीवरील खटला

ठिकाणीं या केसरीकर्त्यांनी आरोपीला युरोपियन ज्यूरीनें निर्दोषी ठरबिलें अर्से म्हटलें आहे. पण वस्तुत: ज्यूरीमध्ये ४ युरोपियन होते व १ हिंदी होता, आणि तिनें एकमतानें आरोपीस निर्दोषी ठरविलें. ही गोष्ट या कोर्टात केळकरांचे नजरेस आणून दिली असतां त्यांनीं येवढाच खुलासा केला कीं, एक हिंदी ज्यूरर होता तो सरकारी पेन्शनर होता. केळकरांनीं या खटल्यांत आरंभापासून अखेरपर्यंत कशी बेमुर्वतखोर वृत्ति ठेविली त्याचें हैं एक उदाहरण म्हणून मी नमूद करीत आहे.

 आक्षेपित लेख समग्र वाचून हाच निष्कर्ष निघतो कीं, जो मनुष्य, खटल्यांतील खरी वस्तुस्थिति माहीत नसतां, हा लेख वाचील, त्याच्या मनांत केळकरांनीं वर्णन केल्याप्रमाणे वागणाऱ्या जजांबद्दल त्वेष, तिरस्कार व तुच्छता या भावना तीव्रतेनें जागृत होतील. जज्जांवर जातिविषयक पक्षपाताचा आरोप त्यांत केला आहे. याबद्दल खुलाशादाखल केळकर यांनी असे समर्थन केलें कीं, ते अजाणतपणे पक्षपातग्रस्त होते. पण माझ्या सहकारी न्यायमूर्तींनीं सांगितल्याप्रमाणे जजाचा पक्षपात हा न कळत असो वा जाणूनबुजून केलेला असो, पक्षकाराच्या दृष्टीनें त्यांत कांहींच फरक होत नाहीं. कोणत्याहि तऱ्हेचा पक्षपात झाला तरी तो त्याच्या हितसंबंधास सारखाच विघातक होणार. भाषांतरांत लेखकाच्या उद्दिष्ट अर्थाचें कदाचित् विकृत स्वरूप झाले असेल अशा आशेनें मीं मूळ पत्राच्या अंकांतून तो लेख वाचला. आणि तो काळजीपूर्वक वाचून, माझें असें मत झालें कीं, मूळ लेख तीव्र करण्याच्या ऐवजीं, एके ठिकाणीं तरी, म्हणजे " मायावी- पणा" याला 'इल्यूझरी मेथड्स्' असा पर्याय योजल्यानें पत्रकर्त्याच्या मनांतील रोख भाषांतरांत थोडा सौम्यच झालेला आहे. मी पुण्याला पुष्कळ दिवस न्यायाधीशाचें काम करीत होतों व त्या वेळीं टिळकांनी चालविलेल्या या वृत्तपत्राची मला चांगलीच माहिती होती. या पत्राइतका मोठा वाचकवर्ग हिंदुस्थानांतील दुसऱ्या कोणत्याहि पत्राला नाहीं असें म्हणण्यास बिलकुल हरकत नाहीं. पत्राच्या प्रत्यक्ष खपापेक्षां वाचकांची संख्या कितीतरी पटींनीं अधिक असते. सरन्यायाधीश व न्या. फॉसेट यांच्यावरील केळकरांची टीका कमीत कमी एक लक्ष लोकांनीं याचली असेल असे म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं. लॉर्ड चफि