पान:केसरीवरील खटला.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
केसरीवरील खटला

असेल तर त्याला ती शिक्षा भोगल्यानें, अप्रामाणिकपणाचा डिफेन्स देणें किंवा माफी मागून स्वाभिमानहानि करणें या गोष्टी टाळतां येतात. पण हा बेअदबीचा गुन्हा माफी मागितल्याशिवाय निस्तरतच नाहीं असे मानलें, व माफी मागण्यास कोणी मनानें तयार नसला, तर त्यानें कोर्टाची इच्छा असे तोंपर्यंत-म्हणजे कदाचित् आरोपीच्या जन्मभरहि-तुरुंगांत राहिले पाहिजे ! मतस्वातंत्र्यावर हा कोण जुलूम ! जन्मठेप काळेपाण्याची शिक्षा म्हटली तरी तिची मुदत वीस वर्षे मानली जाते. बरें, 'कांद्याकरितां भिसमिल्ला' म्हणजे कोर्टाच्या बेअदबीकरितां जन्मभर तुरुंगांत कोणीं रखडावें ! जुलुमानें माफी लिहून घेतील तर ती त्यांची त्यांनाच लखलाभ असो ! अशा विचारानें कोणी माफी देण्यास अखेर तयारहि होईल, पण ती केवळ शाब्दिक, औपचारिक, खोटी, ढोंगी, मनाला न पटलेली अशीच असणार! असल्या माझ्या अधि- काराच्या जोरावर वाटतील तितक्या कोर्टास मिळवितां येतील, पण त्यांनीं त्यांचा मानमरातब किंवा त्यांच्या न्यायकार्यावरील लोकविश्वास या गोष्टी कोीना कशा लाभणार ? म्हणून या प्रकरणीं माझें असें म्हणणें आहे कीं, ज्याच्या योगानें कोर्टाचा अधिकार व आरोपीची सदसदविवेकबुद्धि व स्वाभिमानबुद्धि यांचा मेळ पडू शकतो, अशी निश्चित व समर्याद, मग ती कोणतीहि असो, शिक्षा देणें हेंच युक्त होईल, अशा शिक्षेनें दोघांचेंहि इष्ट कार्य घडण्यास वाव राहील; व न्यायपीठ हैं अमर्यादित राजसत्तेचें प्रतीक होय, व ही राजसत्तादेखील ईश्वरप्रणीत, अशा फार जुन्या काळच्या वेड्या समजुतींचें सल कोर्टाच्या बेअदबीच्या कायद्याच्या पोटांत अजून जिवंत राहिलेलें आहे तेंहि निघून जाईल.

अखेरचे शब्द

 शेवटीं मी माझें म्हणणें फिरून एकदां स्पष्ट करतों. तें असें:- माझ्या लेखापैकी बराचसा भाग म्हणजे विद्यमान न्यायपद्धतीवरील माझी टीका रास्त हक्काची आहे. जाणत्या पक्षपाताचा आरोप मीं केला नाहीं हें प्रतिज्ञे- वर सांगतों, नेणत्या पक्षपाताचा आरोप केला हें मीं प्रतिज्ञालेखांतच कबूल केले आहे. तें माझें मत कायम आहे व बदलणें शक्य नाहीं. असले मत प्रगट करणें यानोंहि बेअदबी होते म्हणून तें प्रगट करण्याची मला परवानगी नाही म्हणाल, तर आपण न्यायबुद्धीनें या प्रकरणीं जी शिक्षा योग्य म्हणून