पान:केसरीवरील खटला.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बेअदबीच्या कायद्याची चर्चा

३३

स्वाभाविक परिणाम म्हणून तो मला भोंवावा, आणि हायकोर्टाच्या हयगयीच्या कृत्याचा परिणाम त्याला कां भोवूं नये ?

बेअदबीच्या कायद्याची चर्चा

 असो. आतां या बेअदबीच्या कायद्यासंबंधानें थोडें सांगतों, हा कायदा निर्गुण, निराकार व म्हणून मोठा गमतीचा आहे. असे असून त्याला शिक्षा पाहावी तर अमर्यादित, न्यायकोर्टाला ही केवढी सत्ता !

 न्या. मार्टेन — होय, ही सत्ता फार मोठी आहे, म्हणूनच तिचा उपयोग फार जपून केला जातो.

 केळकर – बाँचे लॉ-रिपोर्टर २५ पान १९ यांतील एका अवतरणाचा आधार घेऊन मी असे म्हणतों की, केवळ सार्वजनिक हितदृष्टीने जर न्यायकोर्टाच्या निकालावर टीका केली असेल तर तो बेअदबीचा गुन्हा होत नाहीं. माझ्या टीकेंत सार्वजनिक हितबुद्धीशिवाय मुळांत दुसरे काय आहे ? हे म्हणणे आपणांस पटले तर, पूर्वी एका खटल्यांत आपण निकाल दिल्याप्रमाणे, या प्रसंगीहि बेअदबीच्या कायद्याचा पुनः एकदां नुसता स्पष्ट खुलासा लोकांच्या समजुतीकरितां करून मला दोषमुक्त करावें. रास्त टीका व अप्रामाणिक टीका यांतील अंतर केव्हां सुटलें, व अतिक्रमण नक्की कोठे झाले, हे ठरविणे कठीण असल्याने आमच्यासारख्या टीका- कारांना मर्यादेची किंचित् तरी सवलत मिळाली पाहिजे. पण ती न देतां कायद्याच्या नांवानें करडा अंमल झाल्यास, व काळ्यागोयांच्या विरोधी हितसंबंधांत न्यायकोर्टानीं अधिक काळजी न घेतल्यास, लोकांचा विश्वास न्यायकोर्टावर खचित राहणार नाहीं.

 शेवटीं आतां या गुन्ह्याच्या शिक्षेसंबंधानें दोन शब्द सांगून मी आपले भाषण पुरे करतों. हा मुद्दा नाजूक तर खराच, पण तो आतांच सांगितला पाहिजे.न्यायकोर्टाच्या बेअदबीच्या कायद्यांतील शास्त्री व सिद्धान्तवादी, मनाशीं अशी कल्पना बांधून बसलेले दिसत आहेत कीं, बेअदबीच्या पापाला माफी शिवाय दुसरें प्रायश्चित्त नाहीं. पण हे तत्त्व सर्वस्वी अन्यायाचें आहे. इतर कोणत्याहि गुन्ह्यांच्या शास्त्रार्थाचा आधार याला मिळणार नाहीं. कोडांतील काय, किंवा इतर कोणताहि काय, गुन्हा झाला तरी त्याला लहान

के. ख.... ३