पान:केसरीवरील खटला.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
केसरीवरील खटला

करण्यांत येतो, त्यानें काय साधणार? लोकांचा विश्वास ढळला तो निकाल ऐकून परस्परच ढळला. मीं या बाबतींत टीका करून फक्त लोकमत प्रगट केले. आतां मी वर्तमानपत्रकार नसतो तरीहि या निकालाविषयीं हेच बोललो असतों; मात्र तें खासगी संभाषणांत बोललो असतों. पण लोकमताला वाचा फोडण्याकरितांच वर्तमानपत्राचा जन्म आहे. मनुष्य मेला तो विसरून गेला, ज्याची गोळी लागली तो सुटून गेला! मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई तरी मिळावी. पण ते काम म्हणे वरिष्ठ सरकारचें ! मेलेला मनुष्य हा मुंबईसरकारचा प्रजाजन नव्हता काय ?

 न्या. मार्टेन – हे पाहा, या विषयाची चर्चा येथें आम्हांला नको. त्यांत या कोर्टाचा काय संबंध ?

 केळकर – संबंध हाच कीं, लोकांचा न्यायावर विश्वास बसावा म्हणतां तो कसा बसणार हैं या हकीकतीनें मीं दर्शविलें. सेशन्स जजाच्या शिफारशी- प्रमाणें वॉकर यानें अविचार व बेसावधगिरी केल्याचा गुन्हा शाबीत धरून, थोडी कां होईना, पण हायकोर्टाने त्याला शिक्षा दिली असती तर लोकांचें थोडेबहुत समाधान झालें असतें. वॉकर फांसावरच चढला पाहिजे अशी मागणी कोणींच केली नाहीं व नसती. पण ज्यूरीनें त्यावर कोणताहि गुन्हा शाबीत नाहीं, तो सर्वस्वी निर्दोषी आहे, असें ठरवून सोडून दिलें हैंहि लोकांना पटलें नाहीं. ज्यूरीच्या निकालाचा हा अडथळा मागत नसता तर स्वतः हायकोर्टानें वॉकरला थोडीतरी शिक्षा दिली असती असा माझा भरंवसा आहे. तीच गोष्ट ज्यूरीचा निकाल पुढे असतांहि त्यांनी केली असती, तर हलक्या पारड्यांत पासंगापुरतें वजन घालून त्यांनीं ताजव्याचा खोटेपणा काढून टाकला असे झाले असतें. तें करण्याला जी एक न्यायबुद्धीची आंतून उठावणी लागते ती येथे दिसली नाहीं इतकाच हायकोर्टाला मीं येथें दोप दिला. हे ज्यामुळे घडलें तो पक्षपात अजाणता होता. स्वजातीचा पक्षपात खरा होता तो ज्यूरीच्या निकालांत, असा माझा लिहिण्याचा आशय होता. सेशन्स जजाच्या व मॅजिस्ट्रेटच्या निकालानें आठदहा ठळक प्रश्न हायकोर्टाच्या डोळ्यापुढे उभे राहण्या- सारखे होते. व त्यांची उत्तरें समर्पक देऊन मग त्यांनी असा निकाल दिला असता तर कोणी असे लिहिलें नसतें. माझ्या अहेतुक शब्दांचा