पान:केसरीवरील खटला.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३१

वर्तमानपत्रे व लोकमत


न्यायाधिशांकडून जातिविषयक पक्षपात होण्याचा संभव नाहीं. इकडे अनेक जातींची खिचडी असल्यामुळे न्यायाधिशांचें काम अवघड होऊन बसतें.

 केळकर – आपण म्हणतां तें मला मान्य नाहीं. विलायतेंत जन्मसिद्ध जातींची खिचडी नसली तरी, इंग्रज, स्कॉच, आयरिश वगैरे जातींच्या मनांत स्वाभिमानाच्या तीव्र भावना असतातच. मी १९१९ सालीं विला- यतेस गेलो होतो व मी म्हणतों ही गोष्ट तेथें डोळ्याने पाहिलेली आहे.

 न्या. मार्टेन —–पण तो वाद पुरे झाला.

वर्तमानपत्रे व लोकमत

 केळकर- - माझ्या लेखांत मिथ्या विधान नाहीं ही पहिली गोष्ट. त्या विधानावरून पुढे मीं अनुमानें काढलीं तीं युक्तिसिद्ध आहेत, चुकीची नाहींत ही दुसरी गोष्ट. इतकें झाल्यावर मग त्या विधानांतून काय ध्वनि निघतो हे पाहण्याचे काम माझें नाहीं; व न्यायमूर्तीना अप्रामाणिकपणाचा आरोप लावण्याचा ध्वनि त्यांतून निघाला तरी, मी म्हणतों, तो माझा अप्रामाणिकपणा ठरत नाहीं. माझ्या अप्रामाणिकपणाचा आरोप काय तो सरकारी वकिलांनी प्रत्यक्षपणे सिद्ध केला पाहिजे. काल कोर्टाच्या बेअदबी- च्या तत्त्वासंबंधानें जे उतारे वाचण्यांत आले ते मला अमान्य नाहींत. वर्तमानपत्रकारांचे स्वातंत्र्य झाले तरी ते इतर कोणाहि व्यक्तीच्या किंवा अधिकाऱ्याच्या स्वातंत्र्याहून अधिक नाहीं. जो तो आपल्या हक्कमर्यादे- पुरता स्वतंत्र असतो. एकानें दुसऱ्यावर अतिक्रमण करूं नये. पण सामान्य मनुष्यावर जी टीका केल्यानें बेअब्रूचा गुन्हा घडत नाहीं ती टीका न्याया- धीशावर केल्यानेंहि बेअब्रूचा गुन्हा घडत नाहीं. न्यायाधीश लोकांनी सामान्य समंजस माणसाप्रमाणे वागण्यास व टीका करून घेण्यास मनाची तयारी ठेविली तरच कोर्टाविषयीं खरी आदरबुद्धि व त्यांच्या न्यायकार्यावर लोकांचा विश्वास बसेल सामान्य मनुष्याचे सामान्य दोष न्यायाधिशांतहि असतात असें मानणें गैर नाहीं व टीकाकारांच्या टीकेपेक्षां आपल्या चुकीच्या निकालांनींच आपण हा विश्वास ढळण्यास अधिक कारणीभूत होतो हे त्यांनी लक्षात ठेवावें. ज्यावर मीं टीका केली त्या निकालाइतका चुकीचा, सर्वस्वी अयोग्य, असा निकाल देऊन, वरती लोकांचा विश्वास ढळू नये म्हणून बेअदबीचा खटला