पान:केसरीवरील खटला.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्वास कशानें ढासळतो ?

बेअब्रू केलेली नाहीं. बाँचे लॉ. रि. २० पा. १८५ यावरील सुर वि. हॉर्निमन या खटल्यांतील म्या. मू. सर फ्रेंच बीमन यांच्या निकालाचा आधार घेऊन मी असें म्हणतों कीं, बेअब्रूच्या खटल्यांत प्रतिवादीला शब्दाचे अर्थ लावण्याचे काम व अनुकूल प्रतिकूल अनुमानें काढण्याच्या कामीं ज्या सवलती मिळतात त्या कोर्टाच्या बदनामीच्या आरोपांत मला आरोपीलाहि मिळाल्या पाहिजेत.

 न्या. मार्टेन – पण तो बेअब्रूचा दिवाणी दावा होता. हा फौजदारी खटला आहे.

 केळकर – खटला दिवाणी किंवा फौजदारी असला तरी बेअब्रूकारक शब्द कोणते ठरतात व कोणते ठरत नाहींत याविषयींचें मीमांसाशास्त्र एकच असणार. माझ्या टीकेतील आधारभूत गोष्टी सर्व खऱ्या आहेत, व त्या हकी- कतीवरून मी काढलेलीं अनुमानेंहि सरळ व शुद्ध आहेत, तीं असंभाव्य नाहींत.. शिवाय टीका म्हटली म्हणजे तिला थोडीबहुत आजूबाजूला मोकळी जागा वापरण्याला सोडली पाहिजे. आणि माझ्या शब्दांतून माझा अर्थ निघतच नाहीं, व जाणत्या पक्षपाताचाच अर्थ हटकून निघतो, असे दाखविण्यास कोणाला साधन नाहीं.

 न्या. मार्टेन – अजाणता पक्षपात म्हटले तरी त्याचा अर्थ हाचना की काळ्या-गोऱ्यांचा खटला निघाला म्हणजे गोऱ्या न्यायाधिशांना न्यायबुद्धीचा निकाल देतां येऊं नये असा त्यांचा स्वभाव किंवा त्यांचें मनच बनलेलें असतें ?

 केळकर – होय. मी तसेंच म्हणतों. न्यायाधिशानें स्वाभाविकपणें अजाणता पक्षपात केला असे म्हटले तर त्यांत काय बिघडलें ? न्यायाधीश झाले तरी माणसेंच आहेत की नाहींत ? आणि अजाणता पक्षपात हातून होणें हा मनुष्यस्वभाव नाहीं म्हणण्यांत काय अर्थ आहे ? मनुष्यप्राण्याच्या चुका न्यायाधिशांच्याहि हातून होतीलच. न्यायाधीश हे 'सुपरमन' आहेत म्हणजे स्वर्गातून अवतरतात असें थोडेंच अहे ! हायकोर्टावरील अजाणत्या पक्षपाताचा आरोप रतिमात्रहि कमी करण्यास किंवा मागे घेण्यास मी बिलकूल तयार नाहीं.

 न्या. मार्टेन - हिंदी व युरोपियन लोक यांच्या वादांत निःपक्षपाती- -