पान:केसरीवरील खटला.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७-

अप्रामाणिक टीका कोणती ?

आहे कीं, तो आकस्मिक रीतीनें न कळत पडून गोळी उडावयाची तर एकाच्या हातानें तें काम होणार नाहीं. चार माणसांचा हात चुकून पडण्या- इतका जोर बंदुकीच्या घोड्यावर पडला तरच तो पडून गोळी उडेल." पण ही गोष्ट मी पुनः पुनः किती वेळ सांगू ? ही गोष्ट मी सांगतों तें कोर्टाला आवडत नाहींसें दिसतें.

 न्या. मार्टेन — मॅजिस्ट्रेटचें मत सांगून हायकोर्टानें निकाल अप्रामाणिक- पणें दिला असा अर्थ तुमच्या लिहिण्यांतून निघतो कीं नाहीं तें बोला !

 केळकर –तें बोलू नका तर संपलें. नेणत्या पक्षपाताचा आरोप मीं हाय- कोर्टावर केला असल्याचें मीं प्रतिज्ञालेखांतच सांगितले आहे. सरकारी वकीलां- नीं झालें तरी यापलीकडे जाऊन जाणतेपणानें पक्षपात केल्याचा अर्थ माझ्या शब्दांतून कसा निघतो व तोच तेवढा अर्थ त्यांतून निघेल दुसरा निघणारच नाहीं, असें शाबीत केलें नाहीं. जज्ज व मॅजिस्ट्रेट यांचा आधार घ्यावयाचा नाहीं तर माझें बोलणेंच खुंटलें. माझ्या शब्दांतून कोणता अर्थ निघतो व कोणता निघत नाहीं हें आपणांस दिसेल तसे आपण ठरवालच. या कामी तुम्हीच माझे न्यायाधीश व तुम्हीच माझी ज्यूरी आहां.

अप्रामाणिक टीका कोणती ?

 हायकोर्टावर आरोपित केलेला अप्रामाणिकपणा व माझ्या लिहिण्यांतील अप्रामाणिकपणा अशा दोन प्रकारच्या अप्रामाणिकपणाचे आरोप खोडून टाकण्याचा बोजा आपण मजवर टाकीत आहां. पैकीं हायकोर्टाचा निकाल प्रामाणिक कीं अप्रामाणिक हें सर्व खोल जाऊन व सर्व पुरावा पाहून मि. माँटीथ व मि. वाइल्ड यांच्या अभिप्रायाचा आधार देऊन मला ठर वावयाचें आहे. तो माझा मार्ग आपण बंद करून टाकला. तो मार्ग मोकळा असता तर पक्षपातबुद्धीशिवाय ज्याला दुसरें कांहीं कारण सांपडूंच शकत नाहीं इतका चुकीचा हायकोर्टाचा निकाल होता असें मीं सिद्ध करून दिलें असतें. स्वतः माझ्या प्रामाणिकपणासंबंधानें मी येवढेच सांगतों कीं, या कामीं माझा व्यक्तिशः हितसंबंध कांहींच नाहीं. माझें लिहिणे फक्त सार्व- जनिक हितदृष्टीचें होतें. गोष्टी पुण्याजवळच घडलेल्या होत्या. सगळा गांव याबद्दल बोलत होता. ३-४ महिने प्रकरण चालून एक प्रकारचें लोकमत बनलें होतें. या कारणानें इच्छा नसली तरी या अप्रिय व नाजूक विषयावर