पान:केसरीवरील खटला.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
केसरीवरील खटला

असल्याचें पुण्याच्या सेशन जजांनी स्वतःच वर लिहून धाडलें. इं. लॉ. रि.. १ व १५ मुंबई आणि ३६ कलकत्ता, यांत माझ्या म्हणण्याला पूर्ण आधार मिळतो. एक गरीब बिचारा हिंदी खेडवळ प्राणाला मुकतो, व गोऱ्या आरोपीला गोरे ज्यूरर धडधडीत सोडून देतात, हा डोळ्यापुढील प्रकार पाहून तरी हायकोर्टाला दुःखितांना न्याय देण्याची उदार बुद्धि व्हावयास पाहिजे होती. या प्रकरणांतील विशेष परिस्थितीनें हायकोर्टाच्या सदसद्वि- वेकबुद्धीला “ ईश्वराला स्मरून तुला खरें वाटतें तें बोल " असा जणूं काय खडा सवालच टाकला होता. त्याचें उत्तर देण्याचें जबर नीतिधैर्य न्यायमूर्तींनी दाखविलें नाहीं, आणि “जाऊं दे कीं, ज्यूरीचा निकाल बदला व तो बदलण्याची कारणें लिहीत बसा, येवढी यातायात कोण करतो ? " असा देखावा या ठिकाणीं दिसला !

गोष्ट मूळपदावर आली !

 न्या. मार्टेन – वॉकरचा उद्देश गोळी घालण्याचा असणे शक्य नाहीं हें मी म्हणतों तें कसें, हें अद्यापि तुमच्या लक्षांत येत नाहीं, काय करावें ? तुम्हाला बंदुका वगैरे हत्यारांची फारशी माहिती नाहीं यामुळेंहि तें अंशतः घडत असेल; नाहीं असें नाहीं.

 केळकर हत्यारांच्या बाबतींतल्या माझ्या अज्ञानाचा आपण फिरून विनाकारण उल्लेख करतां याचें वाईट व आश्चर्य वाटतें. कमिटिंग मॅजिस्ट्रेट मि. माँटीथ व सेशन्स जज्ज मि. वाईल्ड या दोन गोऱ्या अधिकाऱ्यांना हत्यारें वापरण्याचें ज्ञान आहेना ? मग सेशन्स जजाच्या मताचा खास आधार मी घेत असतां आपण तो मान्य करीत नाहीं, खोडूनहि टाकीत नाहीं, व मी सेशन्स जज व मॅजिस्ट्रेट यांचे अभिप्राय वाचून दाखवीन म्हणतों तर तेहि आपण मला वाचूं देत नाहीं याला काय उपाय ?

 न्या. मार्टेन – मॅजिस्ट्रेटच्या अभिप्रायाशीं मला कांहीं कर्तव्य नाहीं. तुम्हां वर्तमानपत्रकर्त्यांना एकाच बाजूचें समर्थन करण्याची सवय असते. आम्हां न्यायाधिशांना सर्व बाजू व सर्व प्रकारचे संभव पाहावे लागतात.

 केळकर—पण मी म्हणतों, ज्या बंदुकींतून गोळी उडाली ती मॅ. मि० माँटीथ यांनी स्वतः हातांत घेऊन तपासून पाहिली आहे. तशी ती आपण पाहिली नाहीं ! माँटीथसाहेब म्हणतात, "या बंदुकीचा घोडा इतका जड