पान:केसरीवरील खटला.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३

खोटें तराजू, खोटें माप

आरोप नाहीं, तर युक्तायुक्त न पाहतां गोऱ्या आरोपीला पक्षपात करण्या- करितां तसा निकाल दिला असें तुम्ही म्हणतां हा आरोप तुमचेवर आहे.

 केळकर – आपणास मीं असा प्रश्न विचारू नये, पण आतां मी विचारतोंच कीं, आपण म्हणतां तो आरोप मी म्हणतों ती पद्धति वगळून मला नाशाबीत कसा करता येईल हें उदाहरणार्थ सांगण्याची कृपा करा म्हणजे त्या रीतीनें तरी तें करून पाहीन.

 न्या. मार्टेन —– ती रीत हीच कीं, तुम्हीं योजलेल्या शब्दांतून जाणत्या पक्षपाताचा ध्वनि निघत नाहीं हें शाबीत करणें.

खोटी तराजू, खोटें माप

 केळकर – काळें पारडें कोणतें, गोरें कोणतें, एक खालीं कां, एक वर कां, ज्यूरीचा निकाल झाला असा कां व्हावा, हें खुलासेवार सांगण्याला परवानगी द्या म्हणजे माझ्या शब्दांचा खुलासा होईल.

 न्या. मार्टेन – एक पारडें पांढऱ्या रंगाचें म्हणूनच तें दुसऱ्या रंगापेक्षां जड आहे, असें तुमच्या लेखांतच आहे.

 केळकर – होय. पण त्या 'म्हणूनच' या शब्दाचाच अर्थ मला खुलासे- वार सांगावयाचा आहे. पारडें पांढरें खरें, पण पांढरें म्हणूनच अधिक जड हे नुसते शब्द झाले. पण त्या शब्दांची सयुक्तिकताच दाखवावयाला मी परवानगी मागतों. -  न्या. मार्टेन – ठीक आहे. पण जातिनिष्ठ भेदाची सामान्य चर्चा करूं नका.

 केळकर – हायकोर्टाचा निकाल चूक खरा. पण ती त्यांची चूक कां घडली असे मला वाटतें तें कारण मीं खुलासेवार सांगितले तरच माझें म्हणणे सयुक्तिक ठरेल; व माझी टीका वर्तमानपत्रकार या नात्यानें अवश्य व जरूरीची कां होती हेंहि त्यांतल्यात्यांत समजेल. हा प्रकार अगदीं पुण्याजवळ घडला यामुळे त्यावर टीका करण्याचे टाळणेंच शक्य नव्हतें. याचा अर्थ पुढे असा कीं, ज्या स्थितीत मीं टीका केली त्या स्थितीत अशीच ती करावयास पाहिजे होती. शिवाय हायकोर्टाला झाले तरी मी इतकेंच म्हटले आहे, न्यायाचा कांटा त्यांनी सरळ ताठ हातानें धरला असला तरी