पान:केसरीवरील खटला.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
केसरीवरील खटला

केला आहे असें मी कबूलच करतों. अर्थात् आतां आपण म्हटल्याप्रमाणें मी येवढेंच करावयाचें उरलें कीं, जो पक्षपात मीं न कळत केला म्हणतों तो, तुम्हीं म्हटल्याप्रमाणें, जाणूनबुजून केला, हें नव्हे कसें, हें सिद्ध कराव याचें. पण 'अजाणतां' व 'जाणूनबुजून' यांतील भेद मी कोणत्या साधनां- नों दाखविणार ? मजजवळचें साधन म्हणजे मी जे अवांतर विषय आपणापुढे मांडणार आहे ते, आणि त्यांची चर्चा करण्याला तर कोर्टच हरकत घेतें ! म्हणून फिरून मी म्हणतों कीं, मूळ नक्की चार्ज नेमक्या शब्दांनीं ठरविला गेला नाहीं हेंच गैर झालें.

 न्या. मार्टेन – तो विषय फिरून काढू नका. तुमच्या लिहिण्याचा सरळ अर्थ काय होतो येवढेंच पाहावयाचें आहे.

अर्थ करण्याची जबाबदारी

-  केळकर – आणि तो सरळ अर्थ आपणच ठरविणार ! हायकोर्टानें जाणूनबुजून पक्षपात केला असा अर्थ माझ्या शब्दांतून निघतो असें म्हणण्याचाच आग्रह आपण धरला तर मी तरी नाहींच असें कसें म्हणणार ? उलट, मी म्हणतों असा अर्थ निघतच नाहीं, असें आपण तरी कसे म्हणणार ? मला वाटतें, कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणें अर्थ निघतच नाहीं हैं शाबीत करण्याची मजवरची जी जबाबदारी असेल त्यापेक्षां, मी म्हणतों तसा अर्थ कांहीं केल्या निघूच शकत नाहीं, निघतो तो त्याहून अधिकच निघतो, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी वकिलावरच अधिक पडते. तरीहि पण अवांतर म्हटल्या जाणाऱ्या गोष्टींच्या चर्चेनें माझी जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे. उदाहरणार्थ, हायकोर्टाच्या त्या निकालावर मी सरळ हल्ला चढविणार आहे. पण जातिभेद विषयक व्यवस्था हिंदुस्थानच्या कायद्यांत अद्यापि आहे असे मी शाबीत करून देतों म्हटलें त्याला मघाशी हरकत घेतलीत व हायकोर्टाचा निकाल चूक अगदीं चूक, अतिशय चूक असें मी परोपरीने दाखवीन म्हणतों त्यालाहि आपली हरकतच !

 न्या. मार्टेन – मि.केळकर, कायद्यांतील जातिविषयक दोष दाखविण्याचें स्थान हें कोर्ट नाहीं.

 केळकर – जातिविषयक भेदामुळे अन्याय होतो हे दाखविणें हा मुख्य मुद्दा असला तरी देखील – १