पान:केसरीवरील खटला.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९

एका उपमेचा अनर्थ !

'पैकीं आमच्या-आमच्यांतील वादाचा विभाग घेऊन टाकूं. या वादांतून कोर्टाच्या बदनामीचें असें कांहींच निघत नाहीं.

 न्या. मार्टेन – मी तुम्हांला एकदांच सांगतों कीं, या तुमच्या 'मनु- 'स्मृती' च्या वादाशीं प्रस्तुत मला कांहींच कर्तव्य नाहीं.

 केळकर – ठीक आहे, तर नंबर दोनचा विभाग घेऊं. त्यांतहि या न्यायकोर्टाची बेअदबी होण्यासारखे फारसे कांहीं निघणार नाहीं. तथापि त्यांतीलं प्रत्येक गोष्टीचें समर्थन करण्यास मी तयार आहे. फार तर ती एक प्रकारची सरकारावर टीका होईल, व सरकारला ती बदनामीची वाटली तर सरकार तिला फार तर राजद्रोहात्मक लेख म्हणेल, पण ती या कोर्टाची बदनामी खास नव्हे. सर्व सरकारापैकी न्यायखातें हा एक भाग व त्या खात्यापैकीं हायकोर्ट हा एक पोटविभाग. या विभागांतील टीका लिहितांना माझे डोळे हायकोर्टाच्या या निकालावरून क्षणभर अजीबात निघाले होते. तो विषय मी क्षणभर अजीबात विसरलो होतों असेंहि हवें तर म्हणतां येईल. तो वाद काय आहे हे सांगण्याची परवानगी दिलीत तर मात्र सर्व सांगेन.

 न्या. मार्टेन –- पण आपण कांहीं या ठिकाणीं लेजिस्लेटिव्ह असेंब्लींत बसलेलों नाहीं, म्हणून तुम्हाला सरकारच्या राज्यकारभारावर येथें टीका करूं देणे मला शक्य नाहीं, हें मीं तुम्हाला कालच सांगितलें, आपल्या पुढला मुद्दा फारच थोडका आहे. आणि कोर्टाची बेअदबी काय केल्यानें होते अगर न होते याविषयीं हायकोर्टाच्या निकालांतून वर्तमानपत्रांना कायदा नीट समजावून सांगून ताकीद देण्यांत आली आहे. आमच्यापुढे प्रश्न इतकाच आहे कीं, तुमचा लेख वाचून त्यांतून सरळ अर्थ काय निघतो असे सामान्य प्रतीच्या समजूतदार माणसास जें वाटेल याचा विचार करावयाचा.

 केळकर-फिरून आपण मुद्दा अति संकुचित करीत आहां, व हें आधीं लक्षांत घेऊनच मीं या गोष्टीचा अतिरेक होऊं नये असा इशारा आज प्रारंभीच दिला होता. आपण म्हणतां तोच मुद्दा मी घेतों. माझा सर्व लेख एकत्र घेऊन, मीं प्रतिज्ञा लेखांत सांगितल्याप्रमाणे, फिरून एकदमच सांगून टाकतों कीं, हायकोर्ट जज्जांनीं न कळत स्वजातिपक्षपात