पान:केसरीवरील खटला.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

 केळकर - - तोहि अर्थ बरोबर नाहीं. दुसऱ्याकडून अहेतुक रीतीनेंहि झालेल्या तर्कदोषाला बोलणारा आपल्या दृष्टीनें खून म्हणेल. पण मीं मघांशीं सांगितल्याप्रमाणे केवळ ठांसून बोलण्याचा तो एक प्रकार इतकेंच समजावयाचें व त्यांतला ठांसलेपणा काढला म्हणजे 'तर्क लढवितांना घोडचूक केली' इतकाच अर्थ उरतो.

हत्यारांचें ज्ञान नाहीं !

 न्या. मार्टेन --मि. केळकर, तुम्हाला बंदुकी वगैरे उडविण्याचा परिचय आहे काय ?

 केळकर- नाहीं.

 न्या. मार्टेन–पण तुम्हीं रायफल बंदूक कधीं पाहिली आहे काय ? केळकर - होय, पाहिली आहे.

 न्या. मार्टेन - - हें विचारण्यांत माझा मुद्दा हा आहे कीं, सर न्याया- धीश मॅक्लीऑड यांनी सर्व जन्मभर अशा हत्यारांचा उपयोग केलेला आहे. वॉकर प्रकरणी साधी बंदूक नसून रायफल होती व ती त्याच्या मांडीजवळ असतांना उडाली. रायफल बंदूक उडाली म्हणजे मोठा धक्का बसतो म्हणून ती खांद्याशी धरून उडवितात. ती कोणी मांडीशीं धरून उडवील तर त्याला प्रायः इजाच होईल. नेम धरून मारणारा तर मांडीशीं बंदूक धरून कधींच उडविणार नाहीं. तात्पर्य, वॉकरला ज्यांनी दोषमुक्त केले त्यांना अशा हत्यारांची चांगली माहिती असल्यामुळे, कोणीहि मनुष्य दुसऱ्याला गोळी घालणार झाला तर मांडीशीं बंदूक धरणार नाहीं हें त्यांना व्यवहारांत चांगले कळण्यासारखे होतें. वॉकरनें गोळी झाडली असती तर त्याला स्वतःला इजा झाली नसती काय ?

 केळकर- - या हत्याराविषयीं माझें अज्ञान मीं कबूल केलेच आहे. पण माझ्या ज्ञानावर माझी भिस्त नाहीं. वॉकरला सेशनकमिट करणारे मॅजि- स्ट्रेट मि. माँटीथ सेशन जज्ज मि. वाईल्ड हे दोघोह युरोपियन असून त्यांना तरी या हत्यारांची माहिती होती ना ? मॅजिस्ट्रेटचा निकाल मला वाचूं द्या म्हणजे मग काय तें कळून येईल !

 न्या. मार्टेन -- मि. केळकर, सरन्यायाधीश व न्यायमूर्ति फॉसेट्