पान:केसरीवरील खटला.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खुनी आरोपी म्हणजे काय ?

१५

आरोपी वॉकर ) अर्से आहे. या शब्दानें कोटात निर्दोषी ठरलेल्या मनुष्याला तुम्ही फिरून खुनी म्हणतां; तसे म्हणण्याला तुम्हास काय हक्क ? त्यानें तुमच्यावर उद्यां दिवाणी दावा लावला तर ?

 न्या. किंकेड–‘खुनी आरोपी' या तुमच्या शब्दांचे भाषांतर 'मर्डरस अॅक्यूज्ड’ (खून करणारा किंवा मुनांची संवय असणारा आरोपी ) असा होत नाहीं काय ?

 केळकर कायद्याच्या दृष्टीनें तें भाषांतर करावयाचें तर 'खुनी आरोपी म्हणजे 'खुनाचा आरोप आला असलेला आरोपी' असेंच केले पाहिजे.

 न्या. किंकेड–तसे कसे होईल १

 केळकर—कसें होईल म्हणत असाल तर आतांच एखाद्या सरकारी दुभाष्याला (इंटरप्रीटरला) बोलवा पाहूं: तो जरूर माझ्यासारखेच मत देईल.

 न्या. किंकेड–छे, छे, मि. केळकर, तुमच्या मराठी भाषेच्या ज्ञाना- विरुद्ध माझे स्वतःचें भाषाज्ञान मी लढवितो असे मानूं नका. तुम्ही कराल तोच अर्थ मी ग्राह्य मानीन.

 न्या. मार्टेन-- या वाक्यांत न्यायमूर्तींनी 'दिवसाढवळ्या तर्कशास्त्राचा खून केला' असें तुम्ही म्हणतां, याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून अप्रामा- णिकपणें निकाल दिला, असा होत नाहीं काय ?

 केळकर आपले मत मला ग्राह्य वाटत नाहीं. एखाद्या गोष्टीचा “ दिवसाढवळ्या खून केला " असे म्हणणे ही एक जोराने निषेध दात्र- विण्याची माषारूढि आहे. या मुद्द्यावर न्या०किंकेड हे तरी माझ्यासारखे मत देतील असे मला खात्रीने वाटतें.

 न्या. मार्टेन – “ पण तर्कशास्त्राचा दिवसाढवळ्या खून केला याचे काय ?

 केळकर – हीहि एक भाषारूढि आहे. तिचे भाषांतर व अर्थ शब्दशः करूं जाल तर तें हास्यास्पद होईल.

 न्या. मार्टेन –ā मलाहि कळते. कारण वाच्यायाने खुन म्हणण्याला तर्कशास्त्र हा मनुष्यप्राणी खचित नव्हे. पण न्यायमूर्तींनी मुद्दाम जाणूनबुजून खोटा तक लढविला, असा अर्थ तरी होतो की नाहीं !