पान:केसरीवरील खटला.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

झाला ही गोष्ट निदान न्या. किंकेड यांना समजेल. भाषेतील रूढि म्हणतात ती चि. असो. या वाक्यासंबंधानें मी येवढेंच म्हणतों कीं, ब्रिटिश न्यायासंबंधानें आमच्यांतील शहाण्यावेड्यांचा हा एक नेहमींचाच वाद आहे. सार्वजनिक दृष्टीनें अशा मुद्द्यावर आम्हांला नेहमींच लिहावें लागतें. केसरीच्या ४४ वर्षात असला विषय निदान हजार वेळ तरी आला असेल. यावर कोणी म्हणेल, इतके वेळ तोच विषय लिहिण्यासारखे संगदक लोक स्मृतिभ्रष्ट कसे ? पण याला उत्तर कीं, वर्तमानपत्र तेंच असले तरी लेखकांची दरपिढी नवी, वाचकांची दरपिढी नवी, व अशा घडणाऱ्या प्रकारांची पिढीहि पण नवीच असते ! नवा प्रसंग, नवा लेख, हें चाललेच आहे. पण आम्ही वर्तमानपत्रकार कोर्टातील वकिलापेक्षां अधिक स्मृतिभ्रष्ट खास नाहीं. आज खटल्याचा निकाल झाला की उद्या त्याची हकीकत वकील विसरले ! असो. प्रस्तुत वाक्याचा प्रस्तुत आरोपाशीं संबंध पोचत नाहीं. हे वाक्य लिहितांना मुख्य मुद्यावरील टीकेला शाखा फुटत चालली होती असे आपणांस दिसेल.

 न्या. मार्टेन — " इंग्लिशांच्या मायावीपणाचें कौतुक यांतील 'मायावीपणा' म्हणजे काय ?

 केळकर—इंच कों, दिसण्यांत मात्र न्यायाच्या बाबतीत समता. इंग्रज लोक तोंडानें बोलतांना हिंदुस्थानांत सर्वांना सारखा न्याय असे म्हणत असतात. पण प्रत्यक्ष पहावें तर जातिविषयक भेदाभेदांची कलमें कायद्यांत आहेतच.

 न्या. मार्डेन – इल्यूझरी ( मायावी ) याला शॅम ( दिखाऊ ) असा प्रतिशब्द चालेल काय ?

 केळकर – 'मेक चिलीव्ह' असा प्रतिशब्द मी सुचवीन. वरील दोनहि वाक्यें मिळून, ब्रिटिश न्यायाविषय मतभेद असलेल्या आमच्या लोकां- मधील आपापसांतील वादाचा तो एक खेळ आहे. कोर्टाच्या बेअदबीश। त्याचा काय संबंध ? मुद्दा इतकाच कीं, न्यायाची खरी समता नाहीं, भेदाभेद आहेच !

‘खुनी आरोपी' म्हणजे काय ?

न्या. मार्टेन –बरें, पुढील वाक्यांत “अॅक्यूज्ड मर्डरर वॉकर" (खुनी