पान:केसरीवरील खटला.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३

फार्स म्हणजे काय ?

कांहीं लोक काय होतें तें पाहात होते. वरील समजूत कांहींच्या मतें चुकीची असेल, पण मी न्यायमूर्तींना स्पष्ट सांगतों कीं, ही समजूत माझ्या तरी मतें अगदीं बरोबर आहे व ती कशी हें मी पुढे दाखवून देईन. ज्यांनीं वॉकरला सोडून दिला त्यांची कारणें त्यांच्या दृष्टीनें कदाचित् बरोबर असतील; परंतु लोकांपुरतें बोलायचें तर आधीं सर्व गंभीर विचारांची भूमिका तयार झालेली, आणि शेवटीं पाहावें तो हा अनपेक्षित हास्यास्पद प्रकार ! म्हणूनच लोकांना तो " फार्स” वाटला व मीं त्याला. तसें नांव दिलें,

 न्या.मार्टेन—मि.केळकर, मद्रासेकडून येथील हायकोर्टाकडे "डीलाहे” यांच्या खुनाचा खटला आला तो चीफ जस्टिस यांनी चालविला, त्यांत दोघेहि आरोपी सुटले. तो जसा “फार्स" झाला तसलाच हाहि एक फार्स असेंच तुम्ही म्हणालना ?

 केळकर---अलबत होय! आरोपी हिंदी असून ते अशाच प्रकारानें सुटले तर त्यालाहि अलवत फार्सच म्हणावें. मीं नको कधीं म्हटलें ? असले फार्स अनेक होतात. यांतलाच, पण युरोपियन आरोपीचा असा हा एक, येवढेच मी लिहिलें, असो, आपण आतां पुढे जाऊं. 'असले फार्स वॉरन हेस्टिंग्जच्या वेळेपासून होत आले आहेत हे इतिहासच सांगतो. त्याबद्दल मी अधिक कशाला बोलूं ? नंदकुमाराचा खटला हा एक फार्सच झाला व तो पार्लमेंट- पर्यंतहि गेला.असो."असली उदाहरणें धडधडीत डोळ्यासमोर घडत असून " वगैरे हे वाक्य आतां घ्या. या वाक्याचा हायकोर्टाच्या बेअदबीशी संबंध येत नाहीं. तें सर्वसाधारण विधान आहे.

 न्या. किंकेड - 'बृहस्पति' याच मराठी शब्दाचें भाषांतर 'वाईजएकर्स' हे आहे काय व तें कसे ?

 केळकर – तें असें. बृहस्पति हा एक प्रशासंपन्न ब्राह्मण व देवांचा गुरु होता. राज्यावर बसणारापेक्षा राज्यावर बसविणाराचा मान केव्हांहि मोठाच असतो. तसाच या देवगुरूला देवांपेक्षां अधिक मान होता. वाच्यार्थानें बृहस्पति म्हणजे प्रज्ञासंपन्न, खरा शहाणा मनुष्य असा आहे. पण रूढीनें शब्दार्थ बदलून 'शहाण्या'चा 'स्वतःस शहाणा समजणारा' व नंतर 'दीड शहाणा' म्हणजे 'पक्का मूर्ख' असा अर्थविपर्यास क्रमानें