पान:केसरीवरील खटला.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चार्जीतील वाक्यें

११

 केळकर---आपला व ऑस्वोलड यांचा परिचय आहे हे ऐकून मला आनंद झाला. पण मी म्हणतों या मुद्द्यावर त्याचें व आपले मत जुळतें, असे कळेल तर मला अधिक आनंद होईल. आक्षिप्त वाक्यांचा स्पष्ट उल्लेख व्हावा याचें कारण हा खटला निदान वॉरंट केसइतका महत्त्वाचा आहे, व वॉरंट केसमध्ये आधीं चार्ज ठेवल्यावर मगच डिफेन्सला सुरवात होते.
 न्या. मार्टेन- - या खटल्यांत वॉरंट केस कसली काढतां ? ज्या पद्धतीनें हैं काम चालले आहे तीच बरोबर आहे.
 केळकर -- खुद्द ही केस वॉरंट केस आहे असे मी म्हटले नाहीं. ऑस्खोलड यानें अशा खटल्यांत " आरोपीवर चार्ज असेल तो स्पष्ट करून मांडावा " असे म्हटले आहे. या कामी मुद्द्यांचा संकोच झाला तर मलाहि इष्टच आहे असें जें मीं पूर्वी म्हटले त्याचा अर्थ आपणांला आतां कळेल. चाजीत जीं वाक्यें आलीं नाहींत त्यांसंबंधानें आरोप नाहीं असे अर्थात् होईल, आणि मग त्यांसंबंधाची तक्रारहि मला सांगण्याचे कारण राहणार नाहीं. • मला संकोच हवा, पण तो तक्रारींतील हकीकतींचा नको, तर आरोपांतील वाक्यांचा पाहिजे. माझ्या लेखांतील अथपासून इतिपर्यंत सगळेच शब्द म्हणजेच चार्ज असें मी कसे मानूं ?
 न्या. मार्टेन --मि. केळकर, आम्ही दोनहि गोष्टी करणार आहोत.. सर्व लेखाचा साकल्येंकरून विचार करूं. निरनिराळ्या वाक्यांचाहि विचार करूं, मी जातां जातां तीं वाक्यें तुम्हाला खुणा करून देणारच आहे. उगाच त्याची तक्रार करूं नका.
 केळकर - - वाक्यांच्या खुणा तुम्ही सांगत जाल, पण चार्ज ठेवल्या- शिवाय तुमचा भर कशावर हे मला कसे समजणार ?
 न्या. मार्टेन --खुणा केलेलीं जीं जीं वाक्यें तीं सर्व चार्जीतील वाक्ये असेंच समजाना !
 केळकर -- ठीक आहे. पण अशानें डिफेन्सचा संकोच मात्र होणार नाहीं येवढे मी आपणांस आतांच सांगतों. आतां आपण लेख वाचूं. दुसऱ्याच वाक्यांत 'युरोपियन ज्यूररांनीं अभिप्राय दिला' यांतील 'युरोपियन' या