पान:केसरीवरील खटला.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

 न्या. मार्टेन — वॉकरच्या प्रकरणांतील हकीकतीशीं मला कांहीं कर्तव्य नाहीं. पण त्याचेजवळ रायफल जातीची बंदूक होती की साधी बंदूक होती ?

 पाटकर- रायफल होती.

 न्या. मार्टेन – गोळी झाडली गेली त्या वेळी ती रायफल कोठें कशी होती ?

 पाटकर - ती त्याच्या कमरेशीं होती.

 न्या. मार्टेन — वॉकरवर कोणत्या कलमाखालीं गुन्हा शाबीत धरावा. अर्से सेशनजजाचे मत होतें ?  पाटकर-पिनलकोड ३०३ अ.

 न्या. मार्टेन - - ज्यूरीनें तर हा गुन्हा नाशाबीत हे मत सर्वानुमतें दिले आहे.

 पाटकर--होय. ज्यूरींत चार युरोपियन होते, पण एक इंडियन होता..

 न्या. मार्टेन – मुंबई शहरासंबंधानें तरी हायकोर्टाचा रिवाज असा नाहीं काय कीं, ज्यूरीने सर्वानुमतें दिलेला निकाल कोर्टानें सहसा अमान्य करूं नये ? फक्त कायद्याचाच एकादा प्रश्न असेल किंवा सेशन जजानें ज्यूरीचा कांहीं गैरसमज करून दिलेला असेल तरच तो फिरवावा ? पण मुंबईशहराबाहेरोल निकालासंबंधानें काय रिवाज आहे ?

 पाटकर -- क्रि. प्रो. ३०७ कलमाप्रमाणे हायकोर्टाला ज्यूरीचा निकाल अयोग्य वाटल्यास तो फिरविण्याचा पूर्ण अधिकार आहे.

 न्या. मार्टेन--आरोपी वॉकर याला ज्यूरींत युरोपियन लोकांचें बहुमत असावे असे मागण्याचा अधिकार होता, व नवीन कायद्याप्रमाणे आतां हिंदी मनुष्यालाहि तोच अधिकार प्राप्त झाला आहे नव्हे काय ?

 पाटकर - होय. लेख लिहिण्यांत कोर्टाचा अपमान करण्याचा आपला हेतु नव्हता असे केळकर म्हणतात. परंतु लेखाचा उद्देश काय हैं तो लेख वाचून त्यावरूनच ठरविले पाहिजे. आरोपी वॉकरच्या वतीनें कोर्टाने पक्षपात केला असाच लेखाचा रोख आहे. निकाल देण्यांत एकाद्या कोर्टाची तारतम्यबुद्धि चुकली असे कोणों म्हटले तर त्यांत कांहीं वावगे होत नाही. परंतु जज्जांनीं 'खोट्या मापानें' न्याय दिला असा. त्यांजवर आरोप करणें ही रास्त टीका नव्हे.