टीकाकार विष्णुशास्त्री । ७७
लोकभ्रम केव्हा नष्ट होतील? कार्यकारणसंबंध त्यांना कळून विचार करतां आल्यावर. लोकशिक्षणाचा फैलावा झाला तर तो हितावह होय. कां? त्यायोगे सत्यासत्याची निवड करण्याचे सामर्थ्य येतें!
विष्णुशास्त्री यांना जी मानसिक क्रांति घडवावयाची होती ती ही. त्या मानसिक क्रांतीचें आणखी एक लक्षण होतें. तें म्हणजे ऐहिकाविषयीचें प्रेम, हजारो वर्षांच्या संस्कारांमुळे इहलोकाविषयीची आस्थाच हिंदी जनांच्या मनांतून नाहीशी झाली होती. संपत्तीविषयी, षड्विकारांविषयी, नवी दृष्टि देऊन ती आस्था विष्णुशास्त्री यांना जागृत करावयाची होती. ती जागृत झाल्यावर, त्यांच्या ठायीं देशाभिमान ही वृत्ति निर्माण होईल, अशी त्यांची खात्री होती.
प्रवास
कालक्रम आणि भूगोल यांचें महत्त्व त्यांनी अनेक निबंधांत सांगितले आहे. कारण त्यावांचून लोक आंधळेच राहतात. हिंदी लोक इतिहासलेखनाच्या अभावीं पुराणयुगांत म्हणजे तमोयुगांत राहत होते. प्रवासामुळे कदाचित् त्यांना जग दिसलें असतें; पण हजारो वर्षे त्यांनी प्रवासहि वर्ज्य मानला होता. १८७१ साली वयाच्या एकविसाव्या वर्षीच शालापत्नकांत 'प्रवास' हा निबंध लिहून विष्णुशास्त्री यांनी प्रवासाचे महत्त्व हिंदु लोकांना सांगितलें होतें. त्यांतले पहिलेच वाक्य असें आहे. "सांप्रत या पृथ्वीवर मानवजातीस जें एवढे वैभव प्राप्त झालें आहे तें प्रवासाच्या योगाने झाले आहे, असें म्हणण्यास हरकत नाही." आणि शेवटीं प्रवासाचा लोप झाल्यामुळे या देशाचे फार अहित झालें आहे, तरी आता लोकांनी नव्या प्रवास- साधनांचा फायदा घेऊन प्रवास करून मोठा लाभ करून घ्यावा, असा विचार मांडला आहे. या आरंभीच्या एकाच लेखांत विष्णुशास्त्री यांना अभिप्रेत असलेल्या मानसिक क्रांतीचीं सर्व लक्षणें बीजरूपाने दिसून येतात. ज्ञान, ग्रंथ, जिज्ञासा, इतिहासलेखना शोधकपणा, साहस, धारिष्ट, काव्याभिरुचि, विद्याभिरुचि, प्राचीन परंपरेचें प्रेम ग्रीसचा व युरोपचा आदर्श हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्व घटक या निबंधांत आढळतात
पाश्चात्त्य वळण
या सर्वांचा तात्पर्यार्थ असा की, त्यांना हिंदीजनांना पाश्चात्त्य जगांत न्यावयाचें होतें. पाश्चात्त्य विद्येचें वज्र त्यांना यासाठी हवें होतें. वर उल्लेखिलेले सर्व गुण त्या व्रजांत आहेत, याविषवीं त्यांना संदेह नव्हता. त्याच्या साह्याने त्यांना भारताला पाश्चात्त्य युरोपच्या वळणावर न्यावयाचें होतें.
स्वत्व आग्रह
मात्र हे त्यांना स्वत्व रक्षण करून साधावयाचें होतें. नव्या विद्वानांच्या स्वाभिमानशून्यतेवर टीका करतांना त्यांनी म्हटले आहे, "इंग्रेज पहा! त्यांचें भ्रमण साऱ्या जगभर आहे. हव्या तेवढ्या उलाढाली त्यांच्या जेथे जेथे चालल्या