३१८ | केसरीची त्रिमूर्ति
नव्हे, आपण म्हणतां तसा ब्रह्मनिष्ठ मी नाही; पण लहानपणापासून मनांत जेणेंकरून धैर्य उत्पन्न होईल, अशा गोष्टींचा वारंवार विचार करण्याची, मला सवय होती. मंडालेला असतांना मी जी गीता लिहिली तिच्यामुळे मन धैर्यपूरित व उदार झालें. कांही काळ तें सुखदुःखादि द्वंद्व सोडून निश्चल होई. अशा रीतीने मी आपल्या मनाला हें द्वंद्व सहन करण्याचें सामर्थ्य आणलें." स्वदेशी- बहिष्काराच्या चळवळीपासून, तुरुंगवास, हद्दपारी, फाशी झाली तरी सरकारी अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे, असें टिळक सांगूं लागले. त्या वेळींच त्यांच्या मनाने निश्चल होण्याचा अभ्यास पूर्ण केला असला पाहिजे. कारण १९०८ सालीं सहा वर्षांची काळेपाण्याची शिक्षा झाली तरी, तुरुंगांत जातांच त्यांना शांतपणें झोप आली. हीच स्थितप्रज्ञता मंडालेस पूर्णत्व पावली. १९१४ नंतरच्या सहा वर्षांत जे जे लोक टिळकांच्या सहवासांत आले त्यांना त्यांना पदोपदी त्यांच्या या द्वंद्वातीत निश्चलतेचा प्रत्यय आलेला आहे.
वेदान्ती व्यक्तिमत्त्व
ही निश्चलताच नव्हे, तर टिळकांचें सर्व व्यक्तिमत्त्वच गीतेंतल्या वेदान्ताने घडविलेलें होतें. ते पराकाष्ठेचे लोकवादी (डेमोक्रॅट) झाले ते वेदान्तामुळेच. वास्तविक समता, बंधुता, स्वातंत्र्य हीं लोकशाहीचीं तत्त्वें आपण पाश्चात्त्यांकडून घेतलीं आहेत. टिळकांना हें अमान्य आहे असें नाही; पण त्यांच्या मतें या तत्त्वांना जास्त आधार वेदान्तांत आहे. दासनवमीनिमित्त झालेल्या व्याख्यानांत ते म्हणाले, "सर्व माणसें जन्माने सारखी आहेत हें इंग्रजी तत्त्व आहे. पण वेदान्ताचें तत्त्व यापेक्षा उदात्त आहे. त्यांत सर्व माणसांचा आत्मा सारखा आहे, असेंच केवळ नाही, तर सर्व माणसें व प्राणी यांचा आत्मा सारखा आहे असें सांगितलें आहे. जगांतील अत्यंत उदात्त विचारांची एखादी शाळा असेल तर ती वेदान्ताची होय." याच व्याख्यानांत ते पुढे म्हणतात, "धर्म तरी काय सांगतो? तूं स्वतंत्र आहेस, मायेचें पटल आलें आहे तें सोडून दे. संसारांतील लोभाची, क्रोधाची, स्वार्थाची बुद्धि टाकून द्यावी. परमेश्वर होण्याचें सामथ्य आपल्या अंगी आहे, हें धर्माने कळून येईल." सोलापूरच्या व्याख्यानांत असाच विचार त्यांनी मांडला आहे. "मनुष्याचा परमेश्वर होऊं शकतो. आज जमलेल्या हजारो लोकांचा व माझा आत्मा भिन्न नाही. सगळ्या मनुष्यांचा आत्मा एक आहे. तो मीच आहें, मी तो आहे. हें नातें ओळखणारा अधिक तत्त्वज्ञ व देशाचा अधिक हितकर्ता, असें म्हणण्यास हरकत नाही!"
श्रेष्ठगौरव
प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र महत्त्व आहे, तिच्या व्यक्तिमत्त्वाला मान दिला पाहिजे हा राष्ट्रीयत्वाचा व लोकशाहीचा विचार असा वेदान्तांतून स्फुरलेला आहे. रवीन्द्रनाथ ठाकुरजी यांनी एका आठवणींत टिळकांच्या या वृत्तीचा गौरव केला आहे. ते युरोपला निघाले होते. टिळकांनी पन्नास हजार रुपये त्यांना देऊ केले. कशा