या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धर्माचें पुनरुज्जीवन । २५५
पाहिजेत. असें केल्याने ते सर्वांच्या आदरास पात्र होतील. सर्वत्र त्यांना मान्यता मिळेल. हिंदु धर्म हा सत्याच्या पायावर उभारलेला आहे, आणि इतर सर्व धर्म असेच सत्याच्या पायावर उभारलेले आहेत असें तो मानतो. म्हणून तुझा धर्म तुला, माझा मला, अशी त्याची उदार सहिष्णु वृत्ति आहे.
"अशा या उदार धर्माचें साह्य घेऊन आपण आपसांतले भेद त्या महाप्रवाहांत बुडवून टाकले पाहिजेत व एक अभंग, एकसंध समाज निर्माण केला पाहिजे. असें केलें तरच जगतांतील थोर राष्ट्रांच्या मालिकेंत आपल्याला योग्य असें स्थान मिळू शकेल." (बाळ गंगाधर टिळक, हिज् रायटिंग्ज अँड स्पीचेस, गणेश अँड को., मद्रास, पृ. १२-२०).