व्यक्तिमत्व । ११७
(सरकारी ग्याझिट- यांतच एलिफासने आपलें आरोपपत्र प्रसिद्ध केलें होतें) किती झोटिंगपाच्छाईचा मजकूर छापला जातो, व दुराग्रहास वश झाले असतां आमचे विद्यासंपन्न पाश्चात्त्य बंधु कोठवर भरकटत जातात, तर एवढ्यांनेच या प्रत्त्युत्तराचें आम्ही साफल्य समजूं."
सरकार!
सत्यदीपिकाकारांनीहि सरकार हवें तें लिहिण्यास मोकळीक देतें तिचा मालाकार दुरुपयोग करून सरकारास नेहमी शिव्या देत असतात असा आरोप केला होता. त्याला याच अंकांत मालाकारांनी कांदा-लसूण- मोहरी-मिरची असें एकत्र करून, अगदी झणझणीत उत्तर दिलें. ते म्हणतात, "'सरकार' व 'दुरुपयोग' या शब्दांचा अर्थहि आमच्या ख्रिस्ती बंधूस कळत नाही. आमच्या या भाविक व राजनिष्ठ बंधूस जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणी तर सरकार दिसत नसेल ना? पाद्रीसाहेब सरकार, पवित्र शुभ वर्तमान सरकार, मेकॉलेप्रभृति ग्रंथकार सरकार, टेम्स नदी सरकार, साहेबी बूटहि सरकार! विलायती बुटासहि शिरसावंद्य मानीत जा, एरवी तुम्हांला हवें तें लिहिण्याची मुभा आहे!"
नववा आक्ट
निबंधमालेला चार वर्षे पुरीं झालीं त्याच वर्षी "चालू सालचा नववा आक्ट हिंदुस्थानावर आदळला व हजारो लेखण्या एकाएकीं भय-स्तब्ध झाल्या. या आक्टाने कोणत्याहि जातीच्या अगर धर्माच्या लोकांस चिरड येईल असा मजकूर किंवा सरकारच्या राज्यपद्धतीच्या संबंधाने विरुद्ध विचार हीं दोन्ही मना केलीं आहेत!" 'निबंधमाला, वर्ष ४ थें' या अंकांत ही दुष्ट वार्ता देऊन, "देशदूषकांचा समाचार आता आम्हांस बेताबेतानेच घ्यावा लागेल." असें शास्त्री बुबांनी म्हटलें आहे. शिवाय "ख्रिस्ती बंधूंना उत्तर म्हणून लिहिलेला अंक छापखान्याच्या यंत्रावरून उतरून आम्हांस रद्द करावा लागला," असेंहि त्यांनी स्वतःच सांगितलें आहे.
ज्वाला तरी ते
यावरून मालाकार घाबरले व त्यांनी आपली प्रौढी मागे घेतली, असे कित्येकांना वाटलें. त्या वेळी कोणाला तसें वाटले असले तरी तें साहजिकच होते; पण त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी, 'आमच्या देशाची स्थिति' हा प्रबंध वाचला असतांनाहि त्यांच्यावर तीच टीका करावी हैं नवल आहे.
या प्रबंधांत विष्णुशास्त्री हें काय तेज होतें व "विप्रकृतः पन्नगः फणां कुरुते", "केला जरी पोत बळेंचि खाले ज्वाळा तरी ते वरती उफाळे" या उक्ती त्यांच्या बाबतीत कशा यथार्थ होत्या हें कळून येतें. " इंग्रजशाहीपेक्षा मोगलाई बरी होती", "गरीब प्रजेची लूट करून आपल्या तुंबड्या भरणें हाच आमच्या राज्यकर्त्यांचा उद्योग" अशी टीका तर त्यांनी केलीच; पण इंग्रेज येथे आले नसते तर, इतकेंच