व्यक्तिमत्व । ११५
विवेचन मागे केलेच आहे. येथे त्यांचें व्यक्तिदर्शन- या विषयाच्या पूर्ततेसाठी फक्त निर्देश करतों.
इंग्रज राज्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनांत कमालीचा द्वेष असूनहि त्यांचे गुण त्यांनी अनेक ठिकाणीं मुक्त कंठाने गाइले आहेत. त्यांची विद्याभिरुचि, त्यांची उद्योगप्रियता, त्यांची शोधक बुद्धि, त्यांचा देशाभिमान, त्यांची साहसप्रियता, त्यांची ज्ञानलालसा हे गुण आपण आत्मसात् केले पाहिजेत, त्यांच्यापासून शिकले पाहिजेत, असें अगदी मुक्तमनाने त्यांनी वारंवार स्वबांधवांना सांगितलें आहे; आणि त्याचप्रमाणे स्वजनांचे दोषहि त्यांनी परखडपणें सांगून त्यासाठी त्यांच्यावर कठोरपणें टीकाहि केली आहे. आपल्याला विद्याभिरुचि नाही, विद्यानंदाची कल्पना नाही, संपत्तीविषयी, षड्विकारांविषयी आपले सिद्धान्त प्रामादिक आहेत, देशाभिमान ही वृत्तीच आपल्या ठायीं नाही, जातिभेद हें त्याचें कारण आहे, आपण निवृत्तिमार्गी लोक आहों, लोकशाही पद्धति भारताला माहितीच नाही, इतिहास-लेखनाचा अभाव हें आपलें मोठें व्यंग आहे, असे हिंदी जनांचे दोष ते ठायीं ठायीं दाखवितात; आणि बहुधा दर वेळीं युरोपियनांचा कित्ता घेण्यास सांगतात. पण असे असूनहि आपल्या देशाला कांहीएक झालें नाही, असें निक्षून ते सांगतात, आणि सध्याच्या निकृष्ट अवस्थेची अगदी अनैतिहासिक मीमांसा करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करतांना नीर-क्षीर विवेक करूनच क्षीर तेवढे घेण्याचें धोरण कटाक्षाने संभाळले पाहिजे.
मित्रवर्य महाजनी
त्या काळचे एक मोठे पंडित वि. मो. महाजनी हे विष्णुशास्त्री यांचे स्नेही व सहाध्यायी होते. त्यांना विष्णुशास्त्री यांच्या बंधूंनी आपण लिहिलेल्या विष्णुशास्त्री यांच्या चरित्रांत समाविष्ट करण्यासाठी, त्यांच्या ग्रंथांचें परीक्षण लिहिण्यास सांगितलें; पण महाजनी यांनी स्पष्ट कारणें सांगून नकार दिला. कारणें कोणती? विष्णुशास्त्री यांची टीका एकांगी असे. त्यांची भाषा फार जहाल असे. लोकहितवादी, जोतिराव फुले, दयानंद यांच्यावर त्यांनी पूर्वग्रहदूषित मनाने टवाळी केली ती महाजनींना आवडली नाही. त्यांनी अनेक वेळा विष्णुशास्त्री यांना तसे लिहून पाहिलें; पण उपयोग झाला नाही. बंधूंना लिहिलेल्या पत्नांत त्यांनी म्हटलें आहे की, "विष्णुपंत यांनी मराठीची मोठी सेवा केली, ते मोठे देशभक्त होते, हें मला मान्य आहे. तसेंच ते केवळ अंध रूढिभक्त होते असेंहि नाही. अनेक वेळा त्यांनी समाजांतील अविवेकी रूढींवर टीका केलेली आहे; पण दुर्दैवाने ती टीका लोक विसरले आणि त्यांचे 'जॉन्सन', 'इतिहास' हे निबंध दुर्लक्षून 'लोकहितवादी', 'दयानंद' यांच्यावरील निबंधच तेवढे लोकांनी लक्षांत ठेवले." (विश्रब्ध शारदा, पृ. २२२). हैं पत्न वाचून माझ्या मनांत आलें की, विष्णुशास्त्री यांच्याविषयीचा हा अभिप्राय त्यांनी जाहीरपणें वर्तमानपत्रांत मांडावयास हवा होता, किंवा त्यांच्या बंधूंची विनंती मान्य