Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४

केशवसुतांची कविता.


तथापि जर ती गेली आशा निघुनी

एका रात्रींतुनि वा दिवसामधुनी,


स्वप्नामधुनी किंवा न-कशांतुनिही,

तर ती गेली कमती का गे कांहीं ?


सर्व अम्ही जें बवतों करितों वा जें

स्वप्नांतिल तें स्वप्नच, सखये माझे !


कल्लोळांच्या क्षोभें गर्जत आहे

त्या सागरतीरीं उभा गडे ! मी आहें,


धरिले असती मी या स्वकरामाजी

स्वर्णवालुकाकण, जे नसती राजीः


किती थोडके ! परी कसे ते गळति-पहाते पळती

माझ्या बोटांमधुनि, सागरा जाती;

माझ्या नेत्रांमधुनि, आंसवें चलति -आंसवें गळती !


अहा ईश्वरा ! घट्ट मूठ ही वळुनी

पकडाया ते शक्त मी न कां म्हणुनी ?


अहह ! ईश्वरा ! शक्ति न कां राखाया

एकहि कण निर्घृण लाटेपासुन या ?


बघतों आम्ही करितों वा जें सारें

स्वप्नांतिल तें स्वप्नच व्हावें का रे ?


१५ डिसेंबर, १८९२.