Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९३


स्वप्नामध्ये स्वप्न !


सूतिक्लेश सरे अनन्तर सुख्खा तें तान्हुलें देतसे,

पाणी ओसरतां समग्र भरती येते पुनः सागरीं.


युत्याविष्कृति मोक्षकाल करितो खग्रास झाल्यावरी,

कृष्णानन्तर शुक्ल पक्ष चढती तो कौमुदी घेतसे,

प्रातःकाल सुरेख गाढ रजनीमागूनि तो होतसे,

होतां दारुण कल्प-अन्त फिरुनी सृष्टि स्मिता आदरीः-


या गोष्टी गणणें असे सुलभ गे त्यांला जयांच्या मनीं

आशातन्तु नसे अजूनि तुटला; ते भाग्यशाली खरे !

कान्ते ! मत्सम गे परन्तु असती जे या अभागी जनीं,

त्यांची वाट विपत्समाकुल जगीं होणार कैशी बरें ?


उत्कण्ठाज्वलनें तुझा विरह हा टाकी मला पोळुनी,

या गोष्टी गणतां निराश हृदयीं माझ्या भरे कांपरें !


मुंबई, १५ नाव्हेंबर, १८९२.


[६८]

स्वप्नामध्यें स्वप्न !


"All that we see or seem

Is but a dream within a dream, "

-Edgar A. Poe.


हें चम्बन निजमुखावरी माझें घे;

जातां जातां हें मज बोलूं दे गेः-


वाटे तुज कीं, माझे दिवस पळाले

स्वप्नापरि, तें खोटें नच गे बाले;