________________
मोरोपतकृत (४. हत्ती, गजेंद्र. कथासंदर्भ:-मोरोपंतांनी ह्या कथेचा आपल्या कवितेतून शेकडों वेळां उल्लेख केला आहे. केका ६ पृष्ठ २० टीप ८ पहा. या संबंधाने पंतांच्या 'कृष्णस्तवराजां'तील पुढील गीति वाचण्याजोगी आहे:-गजमंबुजं तु शक्रान्नकाचक्रायुधावता भवता । दत्तमनुक्त्वाप्यभयं षड्गग्राहपीडितेभ्यो नः? ॥ २९ ॥ करी ह्या शब्दाची व्युत्पत्ति अशी आहेः-संस्कृतांत अकारान्त नामास 'इन्' प्रत्यय लागून ते त्यास आहे' अशा अर्थाची विशेषणे होतात. हस्त (सोंड) ज्याला आहे तो हस्तिन् हस्ती हत्ती; कर (सोंड) ज्याला आहे तो करी; धन ज्याला आहे तो धनी. या केकेंत 'रि' या अक्षराची आवृत्ति वारंवार झाली आहे ह्मणून कर्णमधुर वृत्त्यनुप्रास साधिला आहे. अनुप्रासः-वृत्त्यनुप्रासाची उत्कृष्ट उदाहरणे पंतांच्या काव्यांत मुबलक आहेत. पुढील चार उदाहरणे पहा:-(१) 'पर्यंकावरि पडला पांडुपृथापुत्र पावला पीडा' । वैरि विजित विक्षतवपु विमुखत्वें वीरवर वरी व्रीडा' ॥ (कर्णपर्व अ०३९ गी०६), (२) 'दुर्गे! देवि ! दयावति ! वरदे ! परदेवते ! सदाधारे !' (दुर्गास्तव २०), (३) 'स्पर्श पिनाकपाणी परमेश्वर पूतपाणि पद्मानें' (कर्ण, २२,२३), (४) ते गतगौरव कौरव रौरव पौर वचकोनि पळतात' (कर्ण ३७. ३८) तृतीय चरणांतील 'करी' हे क्रियापद 'इला किंकरी' करी आणि 'मयूरहि निजात्मजाग्रह विमुक्त करी अशा दोन वाक्यांस प्रकाशित करते म्हणून हा दीपक अलंकार समजावा. एकदेशस्थित दीप असून देशांतरीय पदार्थीला देहलीदीपन्यायाने जसा दाखवितो, तसा 'दीपक' अलंकारही वाक्यांतरस्थ पदार्थांचा अन्वय दाखवितो. 'प्रकृतानामप्रकृतानां चैकसाधारणधर्मान्वयो दीपकम्' [रसगंगाधर-पृ० ३२२.] जेव्हां प्रकृताचा (उपमेयाचा, प्रस्तुताचा) धर्म अप्रकृताला (उपमानाला, अप्रस्तुताला) दाखवितो अथवा प्रकाशित करतो, तेव्हां दीपक अलंकार होतो. दीप जसा एक ठिकाणी ठेविला असतां अन्य ठिकाणच्या पदार्थास प्रकाशित करतो तसा हा अलंकार आदिस्थ, मध्यस्थ आणि अंतस्थ एका पदानें वाक्यार्थाची संगति वसवितो म्हणून याला दीपक असें ह्मणतात. अकृताप्रकृतांचे जरि वर्णिति धर्मैक्य तेंचि दीपक हो, । दानें शोभे मदगज, पराक्रमें भूपर्वशदीपक हो, ॥' (अ. वि.) येथे 'गज' व राजा हे क्रमाने अप्रस्तुत व प्रस्तुत असून त्यांचा 'शोभणे' ह्या एका क्रियेवर अन्वय आहे. उदाहरणे:-(१) 'शक म्हणे वदलासि प्रथम तसे वचन मग असे वदसी। अचल करींच असावा व्यवहारी शब्द संगरीं सदसि' ॥ (वनपर्व), (२) कवि 1 म्हणति वाणि वर्गुनि देवा की सुज्ञ मानवा वेच' (द्रोण.), (३) 'दुर्मत्रं नृप, संगतीस्तव यती, की पुत्रही लालने, वेदानध्ययनें द्विजाति, कुल दुष्पुत्रं, खलाराधनें । नासे शील, न पाहतां कपि. । मदें मा, लाज मयें फुका, शाठ्ये मित्रपणा, प्रवासगमनें स्नेह, प्रमादें रुका' ॥ (वामन.) दीपका• लंकाराचे प्रकारः-दीपकालंकाराचे शुद्ध दीपक, आवृत्तिदीपक, मालादीपक व कारकदीपक असे चार प्रकार मानतात. 'आवृत्तिदीपकचि ते त्रिविध जरी होय दीपकावृत्ति । पतसे घनमाला वर्षतसें रात्रिमान युवचित्तीं ॥ १॥ विकसति कदंबकुसुमें कुटजांकुर होति रसें । माजति सुतृप्त चातक माजति मेघागमें मयूर तसे' ॥ २ ॥ (अ. वि.) नेकांवर अन्वयद्वारे उपकार होण्यासाठी योजिले असल्याकारणाने दीपाअर्थ अथवा दोन्ही, यांची आवृत्ति म्हणजे पुनरुक्ति असल्यास आवृत्ति पोतो. हे आवृत्तिदीपक तीन प्रकारचे आहे: १ शब्दावृत्तिदीपक, - ही प्रफुल्ल होति रसें । मा दीपक म्हणजे अनेकांवर अन्वय सारखें जें पद किंवा अर्थ अथवा दा दीपक नांवाचा अलंकार होतो. हे आघात