________________
केकावलि. स्मरोनि कृतमंतुला, न कवितावधूस्वीकृती _कराल, तरि आयका प्रभु! खराच मी <ष्कृती. । नमस्कृतिपुरःसर वकृति अर्पितों आजि, ती दिली रैविसखें तुम्हां जशि नमोनि सात्राजिती. ॥ ३४ २ अर्थावृत्तिदीपक, व ३ उभयावृत्तिदीपक. तिन्ही प्रकारांची उदाहरणे वरील पद्यांत दिली आहेत. 'मालादीपक दीपक एकावलि यांसि योग जरि होई। मदने हृदयं तिच्या, तद्हृदयें केली स्थिती तुझे ठायीं ॥ (अ. वि.) जेथें दीपक व एकावलि या दोन अलंकारांचा एकत्र योग होतो तेथे मालादीपक हा अलंकार जाणावा. 'ते कारकदीपक जरि क्रमिकैकगत क्रिया कवि ग्रथितो; । जातो, पुनरपि येतो पथिक, पहातोहि, तो पुन्हा पुसतो' (अ. वि.). जेथे एकाच काचा अनुक्रमाने अनेक क्रियापदांशी संबंध असतो तेथे कारकदीपक अलंकार जाणावा. कारकदीपकाची उदाहरणे:-(१) 'अस्मत्परिभव करितो, आजि नभातें शरव्रजें भरितो। गोधन हरितो, वरितो कीर्ति, अशनिभृदरिकरिघटा हरि तो' (विराट० ३-८६), (२) 'आतां सोडवितों पशु, खळबळ पळ न लगतांचि पळवीतों, । मी विजय असें तुजचि न सकळांही कौरवांसि कळवीतों' ।। (विराट ३-११५) तसेंच विराटपर्व अ० ३ गी० १२० पहा. १. माझ्या कविताकन्येचा अंगीकार करण्यास माझ्या अपराधांचा प्रत्यवाय नसावा असे दृष्टांताने सुचवून कवि भगवंताची प्रार्थना करतात. लक्ष्यांत घेऊन. २. कृत (केलेल्या) मंतुला (अपराधाला). [जर आपण कृतमंतुला (मी केलेल्या अपराधांना) स्मरून (लक्ष्यांत घेऊन) कवितावधूस्वीकृति (कवितारूपी कन्येचा स्वीकार) न कराल (करणार नाहीं) कवितारूप नवरीचा अंगीकार आपण करणार नाही, तरि (तर) प्रभु! (हे प्रभो!) आयका (ऐका) मी आपल्यास एका गोष्टीचे स्मरण देतों तें ऐका. मी (मोरोपंत) दुष्कृती (पापी, अपराधी) खराच (खरोखरच आहे). ३. कवितारूपी नूतन स्त्रीचा स्वीकार. 'वधूः स्नुषा, नवोढा स्त्री' इति विश्वः. वधू शब्दाचे (१) पत्नी (२) स्नुपा, सून (३) नारी (४) नवपरिणीता तरुणी असे चार अर्थ आहेत. 'वधूः पत्न्यां स्नुषानार्योः++ नवपरिणीतायाम्' इति हैमः । ४. दुष्कर्मे करणारा, अपराधी, दोषी. ५. न. मस्कारपूर्वक. नमस्कार करणे हा नवविधभक्तींपैकी एक प्रकार आहे. भक्तीचे नऊ प्रकार केका २८, टीप ६, पृष्ठ ७८ येथे दिले आहेत. ६. माझी कृति, स्तुतिरूप कविता. माडी कविता. मी अपराधी आहे म्हणून माझी कविताकन्या तुम्हांला हात जोडून तुमच्या पायां पड़न अर्पण करितो. असे झाल्यावर तिचा स्वीकार करण्यास तुम्हांला कांही चिंता नाही. याला उदाहरण चवथ्या चरणांत दिले आहे. उपमासादृश्यःकवींनी केलेल्या स्तुतींचा पति परमेश्वर आहे अशा प्रकारची (स्तुतीस पतीकडे जाणाऱ्या स्त्रियांची) उपमा ऋग्वेदांतील मण्डल १, सूक्त ९ मंत्र ४ यांत ही आढळते. मंत्राचे भाषांतर:'हे इंद्रा! मी तुझ्या ह्या स्तुती गाइल्या आहेत. उत्सुक होऊन वीर्यवंता तुज पतीप्रत वर गेल्या आहेत.' (वेदार्थयत्न अंक २, पृ० ६०) ७. सूर्याचा मित्र सत्राजित त्याने.