पान:केकावलि.djvu/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. जगदाल्हादक, तापहर, सुवृत्त, शुची,। शशिचे मंडळ, कुळही, तेथ हरिण अंक, येथ हा पशुची' (आदिपर्व १७-२१), (३) 'जी चुंबिली भुजंगें मधुप म्हणेलचि तिला नमो कळिके' (वनपर्व १२-८८), (४) 'जरि शुचिमूर्ति, सुवृत्ता, मान्या श्रवणोचितें गुणे मुक्ता । विद्धा, जडाहि ते; हे अगुणाही तीस करि उणे मुक्ता' ॥ (सन्मणिमाला अ० ४), (५) 'शुकभाषणानुकार प्रेमें करितो मयूर हे चित्र । श्रवण करितील सज्जन रसिक मनी धरुनि जिष्णुचे मित्र' (भीष्मभक्तिभाग्य). सभंगश्लेषाची उदाहरणे:-(२) ते शीतळोपचारी जागी झाली हळूच मग बोले । नलगे औषध मजला, परिसुनि जननी बरे म्हणुनि डोले' (रघुनाथ पंडित-नलाख्यान). (२) 'दुसरे दिवशी प्रभुला वंदिति कपि अंगदादि येऊन । तद्दर्शन तें जाणों त्या सीताती यथेष्ट ये ऊन' ॥ (वनपर्व). (३) 'नंदनवनं व्रजेति त्वमवोचः सत्यमजकुलोत्तंस! स तु वनमगात्तमीक्षितुमविचार्य गतोऽसि नंदनं हंत !' (मोरोपंत-मुक्तामाला १८) निबंधमालेत 'मोरोपंताची कविता' ह्या निबंधांत मालाकारांनी एक ठिकाणी असे लिहिले आहे:-'निजात्मजेचा आग्रह' आणि 'निजात्मजारूप ग्रह' अशी दोन प्रकारचीं पदें वरील समासांत पडण्याजोगी आहेत. 'किरातार्जुनीय' सर्ग १ यांतील पुढील श्लोकांत अशा प्रकारचा पदच्छेद आहे:-अवंध्यकोपस्य विहंतुरापदां भवंति वश्याः स्वयमेव देहिनः। अमर्षशून्येन जनस्य जंतुना न जातहार्देन न विद्विषा-'दरः' ॥ ३३ ॥ येथे 'दरः' किंवा 'आदरः' अशी पदें टीकेंत दाखविली आहेत. [निबंधमाला-अंक ५८ पृ० १३.] पहिल्या रीतीने पदच्छेद केल्यास 'मी परमेश्वरासच वरीन, इतर कोणांस वरणार नाही म्हणून मला परमेश्वरालाच अर्पण करा' असा जो माझ्या स्तुतिकन्येचा आग्रह त्यांतून मला, तिच्या देवा! तुम्ही स्वीकार करून मोकळे करा असा अर्थ निघतो. दुसऱ्या रीतीने पदच्छेद केल्यास कवीने कन्येला ग्रह म्हटले आहे असे होते. कन्येविषयी उद्गारःपित्याला कन्या ही ग्रहाप्रमाणे दुःख देत असते. ती दुसऱ्यास देऊन मी कधी मोकळा होईन असें त्यास वाटत असते अशी लोकांत प्रसिद्धि आहे, त्या रीतीने येथे कवीने निजात्मजेवर ग्रहत्वारोप केला आहे. कवि मोरोपंतांनी भारतांत एका ठिकाणी कन्येसंबंधी लिहितांना पुढीलप्रमाणे उद्गार काढिला आहे:-'आत्मा पुत्र, सखा स्त्री, कन्या चिंताचि, सर्व काळ जिला। प्रसवोनि वाहति मनी श्रीमंतहि पितर सर्व काळजिला' ॥ [मोरोपंत-आदिपर्व-अ० ३० गी० २९.] उद्योगपर्वात असाच उद्गार आढळतो:-'कळतां हिरण्यबाहु क्षितिपाळ म्हणे, 'सुता असाव्या ही । इच्छा अरिसहित शिवो न मिळाला मदितरा असा व्याही.' ॥२०१॥ [मोरोपंत-उद्योगपर्व-अ० १३ पृ. ३२१], कन्येच्या संबंधाने आपल्या कवींची बरीच करडी नजर दिसून येते. या संबंधाने पुढील श्लोक पहाः—'संभवे स्वजनदुःखकारिका संप्रदानसमयेऽर्थहारिका । यौवनेऽपि बहुदोषकारिका दारिका हृदयदारिका पितुः ॥' 'जातेति कन्या महती हि चिंता कस्मै प्रदेयेति महान्वितर्कः । दत्ता सुखं यास्यति वा न वेति कन्यापितृत्वं खलु नाम कष्टम् ।।.' चांगला वर कसा मिळेल, ही चिंता ज्यांना मुली आहेत त्यांना आहेच आहे. या संबंधाने प्रसिद्ध संगीत नाट्याचार्य कै. अण्णा किलोस्कर यांच्या संगीत सौभद्रांतील पुढील पदाची आमच्या रसिक वाचकांस आठवण होईलच होईल 'झाली ज्याची उपवर दुहिता। चैन नसे त्या तापवि चिंता। केवि मिळे पति कुलीन सुंदर। इत्यादि।