Jump to content

पान:केकावलि.djvu/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तरी न इतरा वरी; हरि! करीं इला किंकरी; - मयूरहि निजात्मजाग्रहविमुक्त, जैसा कॅरी.॥ तांबर धारण करणाऱ्या देवा! माझी कवितारूप कन्या (व्यासवाल्मीकादि कवीश्वरांच्या कवितासुतांप्रमाणे) जरी फार साजरी व गुणवती नाही तरी तिचे तुझ्यावरच प्रेम असल्यामुळे दुसऱ्या कोणाला ती वरावयास इच्छित नाही. 'येथे कवीने स्वकाव्यरचनाल्पशक्तित्व सुचवून तद्वारा आपली निरभिमानता दर्शविली.' [य० पां०-पृ० १४१.] पंतांची निरभिमानताः-मोरोपंतांनी कोणत्याही महाकाव्यास आरंभ करण्यापूर्वी निरभिमानपुरःसर नारदव्यासवाल्मीकादि पुराणकवींचा आशीर्वाद मागितल्याचे दिसून येते. व यावरून त्यांची निरभिमानता सुतरां व्यक्त होते. पुढीळ स्थळे पहा:-(१) श्रीमत्सद्गुरु नारदवाल्मीकिव्यासशुककवीश मनीं । आणुनि नमितों भावे जे मोहतमाचिया रवी शमनी' ॥ [भारत.-आदिपर्व-गी० १], (२) 'श्रीनारदवाल्मीकिव्यासपराशरशुकादि सन्मुनि हो! । नमितों हरिगुणकीर्तन मज इतरालाहि हेंचि जन्मुनि हो.' ॥ [ हरिवंश-अ० १ गी० ४], (३) 'वाल्मीकिव्याससमचि वाचा ज्यांची स्तवी सदा देवा। वाक्तनुमनें नमन त्या, वात्सल्ये हेचि त्या रुचो सेवा.' ॥ [मंत्रभागवत-उपोद्घात-गी० १०.] पंतांनी स्वकल्याणार्थ कविता रचली ती उत्तम झाली असें जरि त्यांना वाटत होतें तरि त्यांनी आपली निरभिमानता जागोजागी प्रकट केली आहे. याला एक उत्कृष्ट उदाहरण त्यांच्या 'भृगुचरित्रा'च्या शेवटच्या श्लोकांत दिले आहे. तो श्लोक असा:-'मयूरेश्वरें वर्णिले हे चरित्र । कराया मनोवाग्वपूतें पवित्र ॥ रसज्ञा जनाला नमस्कार आहे । कवित्वें न मद्बुद्धि गर्वासि वाहे' ॥ ४७ ॥ । १.)हिचे प्रेम तुजवर आहे म्हणून हिला (माझ्या कवितारूप कन्येला) आपल्या पायाची दासी करा. किं करोमि इति वदति सा किंकरी, आपली काय आज्ञा आहे असे म्हणून जी नेहमी सेवेत सादर असते तिला किंकरी म्हणावे अशी ह्या शब्दाची व्युत्पत्ति आहे. एखाद्या मनुष्याचे जर आपणावर मनापासून प्रेम आहे तर तो कुरूप असला तरी आपणाला सुरूप वाटतो. तद्वत् माझी स्तुतिकन्या बाहेरून सुंदर दिसली नाही तरी आपल्यावर तिचे प्रेम असल्यामुळे आपण तिला सुंदर मानून तिचा स्वीकार करा मारोपतालाही ३.)निज+आत्मजा+ग्रह+विमुक्त आपल्या कन्यारूपी ग्रहापासून मोकळा. ग्रह-नक्र. माझ्या कन्येचें पाणिग्रहण करून या कन्यारूपी ग्रहापासून मला मुक्त करा. या सामासिक पदाचा 'निजात्मजेच्या आग्रहापासून विमुक्त (मोकळा)' असाहि छेद करितां येतो ह्मणून या पदाचे पुढे लिहिल्याप्रमाणे दोन अर्थ होतात. हैं सभंग श्लेषाचे उदाहरण. श्लेषाचे दोन भेदः-अभंगश्लेष व सभंगश्लेष. ज्यांत एकाच शब्दाचे अनेकार्थ असतात तो अभंगश्लेष, व ज्यांत एका अर्थाचे वेळी जीं पदें काढिली , जातात तीच पदें दुसऱ्या अर्थाचे वेळी काढित नाहीत तर त्यांच्यांत कमीजास्ती करून अथाचे प्रसंगी निरनिराळी पदें काढतात त्यास सभंगश्लेष म्हणतात. अभंग दाहरणे:-(१) 'आर्येला मानियले बहु पाहुनि सज्जनी चमत्कृतिला। खळचि न मानिति तैसे, बहु दूषण सज्ज नीच मत्कृतिला' ॥ (सभापर्व ५-११५), (२) 'पितृसुर तृप्तिप्रद, प्रत्येक